विद्यार्थ्यांनी शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा. - प्रज्ञा मेश्राम
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : १/९/२४ " हुशार आणि होतकरु विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत,मात्र तो शिक्षण घेणारा विद्यार्थी हा होतकरु व नियमित असावा लागतो.छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती पासून फ्रि शिप पर्यंतच्या शासनाच्या अनेक योजना त्यांच्या कल्याणासाठी असतात.विद्यार्थांनी या योजनांची माहिती घेऊन त्याचा योग्य लाभ घ्यावा " असे विचार प्रज्ञा मेश्रामांनी मांडले. त्या ने.हि.महाविद्यालयात ' विद्यार्थ्यांसाठी शासनाची शिष्यवृत्ती योजना ' विषयावर सचित्र बोलत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ डी एच गहाणे होते तर उपस्थितीत उपप्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर,डॉ राजेंद्र डांगे,डॉ धनराज खानोरकर,डॉ.युवराज मेश्राम, डॉ प्रकाश वट्टी उपस्थित होते.याप्रसंगी प्राचार्य डॉ गहाणें नीही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्यांची विशेष माहिती दिली.संचालन डॉ.कुलजित शर्मा तर आभार डॉ वट्टीनी मानले.कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.