मंत्री,धर्मरावबाबा आत्राम यांनी भामरागड येथे पूर परिस्थितीचे पाहणी करून आढावा घेऊन नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश.

मंत्री,धर्मरावबाबा आत्राम यांनी भामरागड येथे पूर परिस्थितीचे पाहणी करून आढावा घेऊन नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश.


चंदू बेझेलवार !! तालुका प्रतिनिधी,भामरागड !!


भामरागड : जिल्ह्यात मागील चार - पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर येवून अनेक भागात नागरिकांचे घर व शेतीचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री,धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले. 

      

मंत्री धर्मरावबाबा आत्रम यांनी आज भामरागड येथे पूर परिस्थितीचे पाहणी करून आढावा घेतला. सिनेट सदस्य तनुश्री आत्राम,गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम,मुख्याधिकारी अभिजीत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.भूषण चौधरी,नायब तहसीलदार रेखा वाणी तसेच विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.



रविवार पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पर्लकोटा नदीला पूर आला व या पुराचे पाणी भामरागड तालुक्यातील गावात शिरले, त्यामुळे शेती व घरांची हानी झाली आहे.सध्या सध्या पाऊस थांबल्याने पुराचा जोर कमी झाला आहे.या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी मंत्री,धर्मावरबाबा आत्राम यांनी केली व नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !