पाणी वाटप संस्थाच्या वतीने सिंचन कार्यालयाला घेराव पाईप लाईनचे व वांल टाकणाऱ्या कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची मागणी.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
सावली : गोरीखुर्द प्रकल्प अर्तगतअस्वला मेंढा तलावाद्वारे सावली तालुक्यातील सावली व कापसी मायनर मधे हजारो हेक्टर शेत जमीनीला पाणी वाटप पुरविण्याचे काम संस्थेच्या मार्फत देण्यात आले असून यांना पाणी पट्टीतून वसुली करून त्यांना त्यांची रोजीची रक्कम देण्यात येतो.
परंतु ज्या कंपनीच्या मार्फत वाल दुरस्ती व पाणी वाटपाचे काम दिलेले आहे त्यां कंपणीने शेवकऱ्यांच्या शेतातून पाईप लाईन चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताला योग्य पाणी वाटप होत नाही. त्यामुळे कोंडेखल,किसाननगर,भटीजाम व घोडावाही येथील कार्यालयातील कर्मचांऱ्यानी योग्य पाणी वाटप करावे पाईप लाईन व वॉल दुरस्ती करावे अश्या प्रकारचे निवेदन कार्यकारी अभियंता पिदुरकर व संबंधित ठेकेदारांना देऊन सुद्धा ते मनावर घेत नाही.
टाळाटाळ करतात व आपल्याच मर्जीने काम करतातत्यामुळे सावली व्याहाड सर्कलच्या कासकारांची अथोनाथ नुकसान होणार आहे त्यामुळे संबंधित अभियंत्यानी लक्ष घ्यावे यासाठी रिपब्लिकन पार्टी चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे सावली तालुकाध्यक्ष तसेच पाणी वाटप संस्थचे अध्यक्ष किशोर उंदिरवाडे,मुकेश दुधे यांनी घेराव घालून कार्यकारी अभियंत्यास निवेदनाद्वारे कळविले आहे.