भामरागड मध्ये मलेरिया ची वरीष्ठ तज्ज्ञांकडून पाहणी.
चंदू बेझेलवार !तालुका प्रतिनिधी,भामरागड
भामरागड : दिनांक, 24 सप्टेंबर 2024 ला भामरागड तालुक्यातील लाहेरी PHC अंतर्गत लाहेरी PHC धोदाराज, होड्री या ठिकाणी दिल्ली येथील वरिष्ठ अधिकारी तसेच,मा.जिल्हा मलेरिया अधिकारी गडचिरोली मा. तालुका अधिकारी भामरागड, मा. MTS प्रदीप चलाख सर यांनी मलेरिया जनजागृती व शासकीय कार्यप्रणाली कशी कार्य करीत आहे या बाबत क्षेत्र भेट दिली व सायंकाळी या सर्व टीम सोबत फ्यामिली हेल्थ इंडिया च्या वतीने चर्चा सत्र आयोजित केले.
असता चर्चेत सुरू असलेला FHI EMBED प्रोजेक्ट,भामरागड,एटापल्ली,व धानोरा या तालुक्यात सुरू आहे त्या संदर्भात सर्व टीम सोबत FHI चे कार्य कसे सुरू आहे गाव पातळीवर कोणते उपक्रम व कोण कोणत्या पद्धतीने गावातील लोकांना मलेरिया व डेंग्यू विषयी जागृतीचे कार्य करीत आहोत या बाबत सविस्तर माहिती देण्यात आली व FHI बद्दल संपूर्ण माहिती दिली.
या चर्चेत प्रोजेक्ट असोसिएट संदेश चुनारकर व BCCF सुनील मज्जी यांनी उपस्थित सर्वाना माहिती दिली या सभे साठी Dr. Dingra Ex-director NVBDCP Dr. Mitthal- Clinton foundation Dr. Supriya- SEARCH foundation मा. DMO, सर THO, सर MTS सर यांनी वेळेत वेळ काढून सहकार्य केले