सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे अंगनात झाडझुड करीत असतांना ; अचानक घराची भिंत कोसळ्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
एस.के.24 तास
सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील रहवासी रसिका देवराम मसराम वय,52 वर्ष ही सकाळी झोपुन उठल्यावर अंगनात झाडझुड करीत असतांना अचानक घरा शेजारील धुरपता वासुदेव मडावी यांचे घराची भिंत कोसळ्याने रसीका मसराम यांचा जागीच मृत्यू झाला.
यावर्षी रत्नापूर व परीसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे घराच्या भिंत कोसळण्याचे प्रमाणही जास्तच आहे परंतु दुसऱ्याची भिंत कोसळ्याने आजस्थीतीत अंगणातील रशीका मसराम यांचा दुदैवी मृत्यू आज दि.1 सटेबर 2024 सकाळी 6.00 वा.चे दरम्यान झाला.
मोलमजुरी करुण आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रशीका मसराम यांचा हा मृत्यु वेदनादायी आहे. या अचानक घडलेल्या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस,तलाठी,पोलीस पाटील यांनी उपस्थीत राहुन पंचनामा केला.
त्यांचे मृत्यु पश्चात दोन मुली,एक मुलगा,नातवंड असा बराच मोठा परिवार आहे.