विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे विहिरगाव येथे आर्थिक मदत.
एस.के.24 तास
सावली : दिनांक,१७ सप्टेंबर २०२४ तालुक्यातील मौजा.विहिरगाव येथे मृत तरुण शेतकर्याच्या कुटुंबियाना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे विहिरगाव येथील जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता दिलीप फुलबांधे व कुस्माकर वाकडे यांच्यात वतीने सदर मदत देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की,मौजा.विहिरगाव येथील काशिनाथ चिरकूटा मेश्राम हे भूमिहीन शेतमजूर आहेत घरातील आर्थिक स्थिती नाजूक असून मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी स्व.जिजाबाई काशिनाथ मेश्राम वय ५२ आणी मुलगा स्व.लालाजी काशिनाथ मेश्राम वय २२ दोन्ही एका मागोपाठ मरण पावले.
काशिनाथ मेश्राम यांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आज त्यांना भेटून सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांनी सांत्वन केले व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्या करिता मोटा व्यवसाय करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून तात्काळ आर्थिक मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना व्याहाड तालुका अध्यक्ष नितीन गोहने,बोथलीचे उपसरपंच नरेश पाटील गड्डमवार,जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता काशिनाथ मोटघरे,प्रमोद उंदीरवाडे,शरद धारणे,विनोद वाकडे,विलास भरडकर,लोमेश टेम्भूर्णे,देविदास बारसागडे आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.