अभियंत्याच्या आंदोलनावर जिल्हा प्रशासन सोबत झाली चर्चा.सि.ई.ओ. कडून आश्वासन.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - जिल्हा परिषदे अर्तगत सेवा देणाऱ्या कनिष्ठ अभियंता ब स्थापत्य सहाय्यक आपल्या विविध मागण्यासाठी दि. ५संष्टेंबर २०२४ पासुन जिल्हा परिषदे समोर उपोषणाला बसले असुन राज्य शासनाकडे वारंवार मागणी करूनही अभियंताच्या मागण्या कडे दुर्लक्ष होत आहे. आता आज दि. १७ संष्टेंबरला मुख्य कार्य पालन अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी अभियंता संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना चर्चसाठी बोलविले होते.
यात राज्य कार्यकारणीचे अध्यक्ष सुहास धारासुरकर , महासचिव प्रदिप हुपरे,कार्याध्यक्ष सचिन चव्हाण , जिल्हाध्यक्ष कालीदास ढवळे , सचिव झापे व विकांत मेश्राम आदि पदाधिकारी सोबत चर्चा करण्यात आली. मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प गडचिरोली व अभियंता संघटना सोबत झालेल्या चर्चेत सि.ई.ओ.मॅडम ने आपल्या स्तरावरील काही मागण्या मंजुर केल्यात राज्य शासन स्तरावरील महत्वाच्या मागण्या राज्य शासनाकडे कळविण्यात आले.
साधक - बाधक चर्चा होवून काही मागण्या मंजुर केल्यानंतर आज दि.१७ संष्टेबर दुपार नंतर उपोषणाची सांगता झाली.अभियंता संघटनेने सिईओ मॅडम चे आभार मानले.