मारिया महाविद्यालय मुल येथे शिक्षण दिन संपन्न.

मारिया महाविद्यालय मुल येथे शिक्षण दिन संपन्न.


मिथुन कलसार - तालुका प्रतिनिधी,मुल


मुल : आज 5 सप्टेंबर 2024 शिक्षक दिनाचे औचित्य साधून मारिया कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मुल आणि जैनुद्दीन जव्हेरी पॉलिटेक्निक कॉलेज मुल त्यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी मारिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर सुकारे आणि प्रमुख अतिथी जैनुद्दीन जव्हेरी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य माननीय सोनपीपरे 


प्राध्यापिका गीतांजली मशाखेतरी मॅडम, सन्माननीय बलवंतजी करकाडे लाभले होते. यांनी समस्त वृंदांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या प्राध्यापिका गीतांजली मॅडम यांनी आपल्या भाषणातून शुभेच्छा व्यक्त करताना गुरु शिवाय मार्ग नाही समाजात मान सन्मान मिळवायचा असेल तर शिक्षण आणि जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त केल्याशिवाय पर्याय नाही.   


विविध उदाहरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा व्यक्त केले. माननीय प्राचार्य सोनपेपरे सर यांनी शुभेच्छा व्यक्त करताना आधुनिक युगात जरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला शिक्षण घेता येत असले तरी ते परिपूर्ण समजून घेण्यासाठी शिक्षकांच्या शिवाय किंवा गुरु शिवाय पर्याय नाही हे आपल्या मार्गदर्शनातून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.


अध्यक्ष भाषणातून प्राचार्य डॉ.सुकारे सर यांनी गुरुचे महात्म्य वर्णन करताना आई-वडील ज्याप्रमाणे आपले प्रथम गुरु तसेच गुरुला सुद्धाआई वडिलांचे स्थान असल्याचं आणि गुरुचे महात्म्य वर्णन करताना पालनकर्ते रक्षण करत्या परमेश्वरची तुलना केली. आपल्याला मिळालेली ज्ञानाची शिदोरी प्रसादाच्या रूपाने आपण जर वाटत गेलो तर सर्वांचा विकास घडून येईल शिक्षक हाच खरा देशाचे आधारस्तंभ निर्माण करणारा शिल्पकार आहे असे मनोगत व्यक्त करून शुभेच्छा व्यक्त केल्या. 


या कार्यक्रमाचे संचालन मेघा निकोडे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका कविता शेंडे मॅडम यांनी केले . याप्रसंगी मारिया महाविद्यालय मुल आणि जैनुद्दीन जवेरी पॉलिटेक्निक कॉलेज मुल येथील समस्त प्राध्यापक आणि कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी गण उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !