धम्मदुत डॉ.गगन मलिक १६ सप्टेंबर ला चिचपल्लीत तथागत बुद्ध मुर्तीचे वितरण सोहळा कार्यक्रम.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
चंद्रपूर : गगन मालिक फाऊंडेशन द्वारा थायलॅड येथून प्राप्त तथागत बुद्ध मुर्तीचे वितरण सन्मान सोहळा गगण मलीक फाऊंडेशन चे अध्यक्ष धम्मदुत डॉ.गगण मालिक यांचे अध्यक्षमेखाली
सम्राट अशोक हायस्कूल चिचपल्ली जिल्हा चंद्रपूर येथे सोमवार दि. १६ सप्टेंबर २०२४ ला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबारे हे असुन प्रमुख पाहुणे म्हणुन धम्मसेवक प्रा.रमेशचंद्र राऊत , प्रबुद्ध चॅनलचे अध्यक्ष सारंग राऊत,विनोद देशपांडे,प्रा.दुषंत नगराळे,धमसेविका पपिताताई कुंभरे सरपंच चिचपल्ली धम्मसेवक उपसरपंच चंदन उंचेकर आदि लाभणार आहेत तर प्रशिद्ध गायक विकास राजा यांच्या बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम होणार आहे.
तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे पियुष गेडाम,मानव वाघमारे,सिद्धार्थ शेंन्डे ,डॉ.प्रणय गेडाम,पराग कांबळे,प्रफुल कुचन कर,डॉ.प्रकाश रामटेके , आशिष बोरेवार,अमित वाघमारे,जल्लोघ निमसरकार,हर्षवर्धन साव हंसु आलोणे आदिनी केलेले आहे.