ढोल,ताशा,डीजे च्या जल्लोष तालात बाप्पा गणेश जी च्या मूर्तीचे शांततेत विसर्जन.

ढोल,ताशा,डीजे च्या जल्लोष तालात बाप्पा गणेश जी च्या मूर्तीचे शांततेत विसर्जन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,१८/०९/२४ अ-हेरनवरगाव येथील जय मल्हार गणेश मंडळ,एकलव्य गणेश मंडळ, श्री राजे गणेश मंडळ, बाल गोपाल गणेश मंडळ यांनी स्थापन केलेल्या बाप्पा गणेश मूर्तीचे विसर्जन आज सद्भावना पूर्ण , शांततामय वातावरणात डीजेच्या तालबद्ध संगीताच्या ठेक्यावर भाविक भक्तांनी नाचत नाचत  बाप्पाला अखेरचा निरोप देऊन येथील तलावात विसर्जन केले.




श्री.मूर्तीच्या स्थापनेनंतर दहा दिवस चालणाऱ्या या भक्तीमय, मनोरंजनात्मक, संघटनात्मक कधी ढगाळ , कधी निरभ्र वातावरणात वेगवेगळ्या गणेश मंडळांनी भजन, वेगवेगळ्या विविध स्पर्धा, डान्स हंगामा, वैयक्तिक गीत गायन स्पर्धा, तीन अंकी नाटक आणि  मनोरंजनाची अनेक कार्यक्रम केले.या कार्यक्रमास व गणेशजीच्या  मूर्तीचे दर्शन चिमूर विधानसभा क्षेत्रातील नेते मंडळींनी मान- सन्मान न पाहता अगदी साधेपणाने  गावातील प्रत्येक गणेश मंडळाला भेटी देऊन गणरायाचे दर्शन घेतले.

काल १७ /०९ ला गोपाल काला व सहभोजना निमित्त आयोजित कार्यक्रमास श्री राजे गणेश मंडळ द्वारे आयोजित कार्यक्रमाला डॉ सतीश वार्जुरकर राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र ,रोशन ढोक उपसभापती पंचायत समिती चिमूर,वामनरावजी मिसार किसान सेल तालुका अध्यक्ष ब्रह्मपुरी, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गुड्डू वाघमारे, शरद भागडकर उपसरपंच भालेश्वर व प्रतिष्ठित गावकरी व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


एकलव्य बाल गणेश मंडळ यांनी आयोजित गोपालकाला व सहभोजनाच्या कार्यक्रमाला  धनराज भाऊ मुंगले संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी चिमुर, सुरेश दुनेदार सरपंच पिंपळगाव भोसले, धनराज मेश्राम, वामनरावजी मिसार माजी उपसरपंच , प्रतिष्ठित गावातील नागरीक यांच्या उपस्थितीत धनराज भाऊ मुंगले यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

 

सदर कार्यक्रमाप्रसंगी पहिल्यांदाच गणेश मूर्ती तयार करून लोकांची मने जिंकणारा मूर्तिकार उमेश मनसाराम चंडिकार , आपल्या नृत्यकलेने नृत्यकला सादर करून व नृत्य कलेचे इतर मुलीं, मुलांना धडे देणारा बालकलाकार अक्षय हिरालाल मेश्राम यांचा यावेळी शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच डॉ सतीश वार्जुरकर यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागी कलाकारांना दिलेल्या भेट वस्तूचे वितरण सुद्धा धनराज भाऊ मुंगले यांच्या हस्ते करण्यात आले.


 गोपालकाल्या निमित्य बाल गणेश मंडळांच्या वतीने आयोजित तीन अंकी नाटक अभागी चे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष क्रिष्णा भाऊ सहारे यांनी माजी उपसभापती विलास उरकुडे पंचायत समिती, ब्रह्मपुरी यांच्या अध्यक्षतेखाली  श्रीकांत पिलारे ग्रामपंचायत सदस्य, अ-हेर नवरगाव,सुधीर दोनाडकर पिंपळगाव भोसले,  प्राध्या. मंगेश देवढगले, रमेश करंडे देवस्थान तलाव सचिव, कॉन्ट्रॅक्टर मेंढूले , सिद्धेश्वर भर्रे ब्रह्मपुरी, रमेश ठेंगरे तलाव देवस्थान अध्यक्ष ,अकुल राऊत पोलीस पाटील, चंद्रकांत गाताडे ग्रामपंचायत सदस्य, धनपाल उरकुडे ,महेश मिसार पिंपळगाव भोसले, सौ सरिता उरकुडे सदस्या ग्रामपंचायत अ-हेरनवरगाव यांच्या उपस्थितीत केले.


गावातील सर्व गणेश मंडळांनी शांततापूर्ण वातावरणात गणपती बाप्पा मोरया  - पुढच्या वर्षी लवकर या एक लाडू फुटला - गणपती उठला,गजानन महाराज की, जय..या प्रकारच्या जयघोषाने गणपतीचे पाण्यामध्ये विसर्जन करून जड अंतकरणाने परत आपल्या घरी माघारी फिरले


गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत...

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !