मा.आ.प्रा.अतुल भाऊ देशकर यांच्या हस्ते गुरुदेव सेवा मंडळ प्रार्थना मंदिर भूमीपूजन संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,३०/०९/२४ तालुक्यातील हळदा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुदेव सेवा मंडळाचे स्वतंत्र प्रार्थना केंद्र असावे अशी येथील गुरुदेव भक्तांची इच्छा होती. या संदर्भात त्यांनी अतुल भाऊंनी मागणी केली असता तत्कालिन खासदार मा. अशोकभाऊ नेते यांच्याकडे पाठवपुरावा केला असता त्यांनी खासदार स्थानिक निधी २०२३-२४ अंतर्गत १० लक्ष रुपये मंजूर केले होते. या प्रार्थना मंदिराचे भूमीपूजन गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत पार पडले.
राष्ट्रसंतानी गावाकडे चला असा संदेश दिला होता ज्या माध्यमातून समाज एकत्रित होईल. परंतु आजच्या परिस्थित काही लोक दोन समाजामधे - धर्मांमधे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थित गुरुदेव भक्तांसाठी तयार होत असलेले प्रार्थना मंदिर सर्व समाजाला धर्माल एकत्रित करण्याचे काम करणार आहे.
या प्रसंगी गुरुदेव भक्तांसह भाजपा तालुकाध्यक्ष अरुण शेंडे, माजी जि.पी सदस्य शंकरदादा सातपुते, तनय देशकर, विनोद नखाते, सरपंच दौलत गरमळे, माजी सरपंच राजेंद्र मस्के, शंकर आष्टेकर, विलास डोमले, साहिल आष्टेकर यांच्या सह हळदा ग्राम वासिय मोठ्या संखेने उपस्थित होते.