एकलव्य बाल गणेश मंडळांने दिला बाप्पाला अखेरचा निरोप
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,१९/०९/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेर नवरगाव येथील एकलव्य बाल गणेश मंडळाने स्थापन केलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन येथील स्थानिक तलावामध्ये शांततापूर्ण वातावरणात केले.
या गणेश मंडळांने स्थापन केलेल्या गणेश मूर्तीचे गोपाल काला व सहभोजनासाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी संघटक धनराज भाऊ मुंगले यांनी सुरेश दुणेदार सरपंच पिंपळगाव भोसले, वामनरावजी मिसार किसान सेल तालुकाअध्यक्ष, धनराज मेश्राम, सखाराम ठेंगरे अ-हे नवरगाव यांच्यासह उपस्थित राहून पहिल्यांदाच गणेश मूर्ती घडविणारा मूर्तिकार उमेश मन्साराम चंडीकार व नृत्य कलेने मोहुन टाकणारा मुले व मुली यांना नृत्य कलेचे धडे देणारा बालकलाकार अक्षय हिरालाल मेश्राम यांचा यावेळी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
दहा दिवस चालणाऱ्या कार्यक्रमासाठी एकलव्य गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य गण मंगेश जराते, संभा शेंडे, कालीदास शेंडे,बारसु चांदेकर,सौ वंदना मेश्राम,श्रीमती कमळजा शेंडे व बाल गोपाल आबालवृद्ध यांनीअथक परिश्रम घेऊन शांततेत पार पाडली आणि आनंदात नाचत बाप्पाला अखेरचा निरोप देत विसर्जन केले..
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषवाक्याने....
गणेश विसर्जन करताना कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून अ-हेर नवरगाव बीट जमादार अरुण पिसे हे आपल्या सहकाऱ्यांसह तसेच पोलीस पाटील अकुल राऊत बंदोबस्तासाठी उपस्थित होते.