रामनगर च्या प्राथमिक शाळेत पोलीस दला तर्फे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न ; बदलापूर सारख्या घटना घडू नये.यासाठी मुलांना जनजागृती. - वैशाली बांबोळे
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : बदलापूर सारख्या घटना शाळेत घडू नये यासाठी शाळेतील मुलामुलींना माहिती देणे गरजेचे आहे. कायदा सर्वासाठी आहे. कायद्याची माहीतीही आपणास माहीत असणे गरजेचे आहे. एखादया व्यक्तीने गुन्हा केला तर पोलीस स्टेशन आहे लगेच माहिती पुरवा हेल्पलाईन आहे.
तेव्हा लहानपणा पासुनच कायघाची माहीती असली तर आपली प्रगती नक्कीच होईल अश्या प्रकारचे मार्गदर्शन महिला समुपदेशक वैशाली बांबोळे पोलीस स्टेशन गडचिरोली यांनी केले. दंडकारण्य शैक्षणिक शिक्षण संस्थेच्या रामनगर येथील उच्च प्राथमिक शाळेत शाळेच्या मुख्याध्यापिका पौणिमा रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक जनजागृती चा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी भरोसा सेल च्या राजश्री रामटेके यांनी मुलांना व शिक्षकांना कायदा विषयक माहिती सांगीतली. कार्यक्रमास पोलीस स्टेशनचे,अमोल किरमिरवार,वच्छला वालदे तसेच शाळेचे शिक्षक गेडाम सर,बानबले सर,चुधरी मॅडम तसेच शाळेचे विद्यार्थी प्रामुख्याने हजर होते.