प्रथमेश कानव्हेंट,प्रियदर्शी विद्यालय आणि मॅजिक बस यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींची फुटबॉल स्पर्धा संपन्न.

प्रथमेश कानव्हेंट,प्रियदर्शी विद्यालय आणि मॅजिक बस यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींची फुटबॉल स्पर्धा संपन्न.


एस.के.24 तास


चंद्रपूर : १४/०९/२०२४ प्रथमेश कानव्हेंट, प्रियदर्शी विद्यालय आणि मॅजिक बस यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन प्रथमेश कॉन्व्हेन्ट घुग्गुस येथे करण्यात आले.मुलींचा सर्वांगीन विकास व्हावा व शाळेत सुरु असलेल्या जिवन कौशल्य विकास आणि फुटबाल च्या सत्र  उपक्रमातुन खेळामध्ये त्या जिवन कौशल्य चा उपयोग कश्याप्रकारे करता येईल.

या उद्देशातून तसेच मुलींना फुटबॉल खेळाची संधी उपलब्ध व्हावी व समोर शिक्षण पूर्ण करून मुलींनी खेळाच्या माध्यमातून पुढे यावं व स्वतःची उपजीविका निवडावी ह्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेला उपस्थिती म्हणुन प्रथमेश कानव्हेंट चे मुख्याध्यापक मा. श्री. साठे सर, शिक्षिका शालीनी बोबडे, राखी पोटले, क्रिडा शिक्षक राम सर व प्रियदर्शी कन्या विद्यालय चे मुख्याध्यापिका सौ. अंजु खंजुडे, सहा शिक्षक लेडांगे सर, रंजना गावंडे


 मॅजिक बसचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे, नितिन उपगनलावार उपस्थित होते. स्पर्धेत प्रथमेश कॉन्व्हेन्ट व प्रियदर्शी विद्यालयाचे १२ ते १३ वयोगटातील मुलींचे संघ सहभागी झाले होते. मुलींच्या संघामध्ये  प्रथमेश कानव्हेंट प्रथम क्रमांक तर प्रियदर्शी कन्या विद्यालय द्वित्तीय क्रमांक पटकविला. यामध्ये उत्कृष्ट खेळाळू रेचल उईके, साक्षी कावळे, देहर्शिका जुमनाके व उजमा इस्लाम ठरले. 


विजयी संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आले. सामन्यांचे आयोजन फुटबॉल कोच मुस्कान शेख हिने केले तर रविशंकर प्रसाद कोच, चंदन मासरकर, समुदाय समन्वयक श्रेया जोगे यांनी सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !