बोंडाळा (खुर्द) वासिय नागरिकांचा संतोष सिंह रावत यांच्या उमेदवारी बाबात पक्का निर्धार.

बोंडाळा (खुर्द) वासिय नागरिकांचा संतोष सिंह रावत यांच्या उमेदवारी बाबात पक्का निर्धार.


राजेंद्र वाढई : उपसंपादक


मुल : रविवार दिनांक १ सप्टेंबर रोजी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील बोंडाळा (खुर्द) येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी जी.प.अध्यक्ष,माजी नगराध्यक्ष,कृषी ऊ.बा.समिती सभापती सन्माननीय संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. 

सदर बैठकीला मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार,जिल्हा कांग्रेस महासचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजू पाटील मारकवार,माजी उपसभापती,दशरथ वाकुडकर,संचालक योगेश शेरकी, जालिंदर बांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता यांची बैठक घेण्यात आली. 


सदर बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष सिंह रावत यांनाच बल्लारपूर विधानसभेची उमेदवारी द्यावी. त्यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणू असा निर्धार बोंडाळावासिय गावकऱ्यांनी व युवक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला. संतोष भाऊ आगे बढो,हम सब तुम्हारे साथ है.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !