संविधान कुणाच्या बापाचा बाप आला तरी बदलू शकत नाही. ★ संविधान बदलण्याचा विरोधकांचा अपप्रचार विधानसभा निवडणुकीत चालणार नाही. - केंद्रीय राज्यमंत्री, रामदास आठवले

संविधान कुणाच्या बापाचा बाप आला तरी बदलू शकत नाही.


संविधान बदलण्याचा विरोधकांचा अपप्रचार विधानसभा निवडणुकीत चालणार नाही. - केंद्रीय राज्यमंत्री, रामदास आठवले



एस.के.24 तास

अहमदनगर : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान कुणाच्या बापाचा बाप आला तरी बदलू शकत नाही हे त्रिवार सत्य जनतेला कळले आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलण्याचा धोका असल्याचा अपप्रचार केल्याने महायुती चे थोडेफार नुकसान झाले आता विधानसभा निवडणुकीत मात्र संविधान बदलण्याचा विरोधकांचा अपप्रचार टिकणार नाही असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.


अहमदनगर मधील सहकारी सभागृहात संविधान सन्मान सोहळा आणि तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल ना. रामदास आठवले यांचा
अहमदनगरवासियांकडून भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ना रामदास आठवले बोलत होते.यावेळी विचार मंचावर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे; आमदार संग्राम भय्या जगताप; प्रा.सुनील मगर; रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे; श्रीकांत भालेराव; :विजय वाकचौरे; सुरेंद्र थोरात; राजा कापसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.


लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघात मला उमेदवारी दिली असती तर दक्षिण नगर ची सुजय विखे यांचीही जागा निवडून आली असती अशी खंत ना.रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.

महायुती सोबत रिपब्लिकन पक्ष मजबुतीने उभा आहे विधानसभा निवडणुकीत महायुती चे 180 पर्यंत आमदार निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्ष महायुतीला साथ देईल.प्रा जोगेंद्र कवाडे आणि मी आम्ही दोघे रिपब्लिकन नेते महायुती सोबत आहोत त्यामुळे महायुती ने रिपब्लिकन पक्षाकडे लक्ष द्यावे ; रिपब्लिकन कार्यकर्त्यांना सन्मान द्यावा अशी सूचना ना.रामदास आठवले यांनी केली.


रिपब्लिकन ऐक्या साठी आम्ही सदैव तयार आहोत.मी केंद्रात मंत्री झाल्यामुळे कवाडे सर मला आमच्या कडे लक्ष द्या म्हणतात पण मी जेंव्हा त्यांच्या कडे लक्ष दिले तेंव्हा ते माझ्यासोबत आले नाहीत 1990 मध्ये ते माझ्या सोबत आले असते तर रिपब्लिकन पक्षाचे 15 जन तरी मंत्री झाले असते मात्र माझ्या सोबत कोणी अन्य गटाचे नेते आले नाहीत त्यामुळे मी एकटाच तेंव्हा मंत्री झालो. राजकारणात कधी कोणाला पाठिंबा द्यायचा हे मला चांगले कळते असे ना. रामदास आठवले म्हणाले.



प्रा जोगेंद्र कवाडे यांनी ना.रामदास आठवले तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री झाल्याबद्दल त्यांच्या सत्कारानिमित्त अभिनंदन केले.डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष देशभर मजबूत केल्याबद्दल त्यांनी ना.रामदास आठवले यांचे कौतुक केले आणि ते केंद्रात मंत्री असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे सांगत रिपब्लिकन ऐक्याचा नारा प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी दिला.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते प्रा.जोगेंद्र कवाडे आणि केंद्रीयराज्य मंत्री ना.रामदास आठवले यांच्या भाषणाची जुगलबंदी नगरकरांना अनुभवण्यास मिळाली.

तू मत कर अगर मगर
तेरे शहर का नाम है अहमदनगर
मुझमे और कवाडे सर मे है दलित मुक्ती की जिगर
अशा अनेक उत्स्फूर्त कविता सादर करीत ना.रामदास अठवले यांनी सभागृह जिंकले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !