शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रियाज शेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.
मुनिश्वर बोरकर
अहेरी : जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने अहेरी येथील वनविभाग मैदान येथे महिला व शेतकऱ्यांशी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संवाद साधला. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री,धर्मरावबाबा आत्राम, पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष मा.सौ.रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मा.श्री सुरज चव्हाण, गडचिरोली जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या उपस्थितत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
शिवसेना (उबाळा) चे धुरंधर नेते,रियाज शेख यांच्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे अहेरी विधानसभेत शिवसेना खिडखिळी होणार असल्याचे चित्र दिसत असुन.त्यांच्या पक्ष प्रदेशावेळी महिला भगिनी आणि शेतकरी बांधवांचा उस्फुर्त प्रतिसाद बघायला मिळाला. तर अजितदादांमुळे विविध योजना महिला आणि शेतकरी बांधवांसाठी पर्वणी ठरत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.