बालपणापासूनच पोलिस अधिकारी व्हायचे स्वप्न साकार झाले. - ठाणेदार,सुमित परतेकी


बालपणापासूनच पोलिस अधिकारी व्हायचे स्वप्न साकार झाले. - ठाणेदार,सुमित परतेकी


★ प्रेस क्लब मुल वतीने आयोजित “ मीट द प्रेस ”


राजेंद्र वाढई ! उपसंपादक !


मुल :- आपल्या आयुष्यात प्रत्येकाणी खिलाडू पणाला अंगीकारले यास जीवन समृध्द होते असे मत ठाणेदार सुमीत परतेकी यांनी व्यक्त केले. प्रेस क्लब मूलचा वतीने आयोजीत ‘मीट द प्रेस’ या कार्यक्रमात त्यांनी आपले मत व्यक्त केले, मुळचे नागपूर येथील रहीवासी असलेले ठाणेदार परतेकी हे संपन्न घराण्यातील , वडिल पोलिस विभागात असल्यांने, बालपणापासूनच पोलिस अधिकारी व्हायचे असेच स्वप्न त्यांनी पाहील्यांचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात त्यांनी सांगीतले.

ठाणेदार सुमीत परतेकी स्वत: पोलिस विभागात ठाणेदार आहेत, तसेच पत्नीही पोलिस विभागात कार्यरत असलेल्यांनी कौंटूबिक अडचणी निर्माण होतात काय? या प्रश्नावर त्यांनी, आमचे कौटूंबिक बायडिंग खूप चांगली असल्यांने, तशा अडचणी निर्माण झाल्या नाहीत ही आशादायी बाब असल्यांचे त्यांनी सांगीतले.

आपण पोलिस विभागात रूजू झालो नसतो तर, वनविभागात नौकरी केली असती असे त्यांनी स्पष्ट केले. अमरावती, नागपूर येथे नौकरी केल्यांने, कायद्याचे बारकावे समजता आले, स्ट्रॅटेजी आखता आली असे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात सांगीतले.

माझी पीएसआय म्हणून झालेली नेमणूक ही आपल्यासाठी आपल्या जीवनातील आनंदाची घटना असल्यांचे सांगीतले तर,मूल शहरात रूजू झाल्यानंतर दोन महिण्यातच मूलचे नेते संतोषसिंह रावत यांचेवर झालेला गोळीबार आपल्यासाठी धक्कादायक होती हे कबूल करीत,याच दरम्यान आपली आई आयसीयूत भरती असल्यांने, त्यावेळी त्यांनी आपल्या जीवनातील तो कठीण प्रसंग असल्यांचे सांगीतले.


शहरात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्यांचे सांगून,सीसीटीव्ही मुळे अनेक गुन्हे उजेळात येत आहे, अनेकांना त्यामुळे लाभ देता येत आहे. मूल येथील सीसीटीव्ही मुळे सिंदेवाही, नागभीड, सावली, गडचिरोलीसह अनेक शहरातील गुन्हेगांराचा छडा लावता आला याचे अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी सांगीतले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !