अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी - ०७/०९/२४ पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी अंतर्गत ब्रह्मपुरी शहर व ग्रामीण भागामध्ये गणेश उत्सव साजरा होत असल्याने त्या गणेश मंडळांना तसेच डीजे चालक व मालक यांना मार्गदर्शन करण्याकरिता दिनांक ०६/०९/२०२४ ला राजीव गांधी सभागृह ब्रह्मपुरी येथे मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेला मार्गदर्शक म्हणून माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ठोसरे साहेब ,नगरपरिषद ब्रह्मपुरी च्या मुख्याधिकारी श्रीमती आरशिया जुई मॅडम, पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती शितल खोब्रागडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
तसेच गणेशोत्सव मंडळाचे वतीने खेमराजजी तिडके श्रीमती रश्मीताई पेसने यांनी पण आपल्या गणेश मंडळा च्या वतीने आयोजित करीत असलेल्या कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला ब्रह्मपुरी तालुक्यातील पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस पाटील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच डीजे चालक व मालक यांची सुद्धा उपस्थिती होती .
जवळपास २००ते २५० स्त्री पुरुष या कार्यक्रमाला उपस्थित गणेश उत्सव मंडळ ,डी .जे. चालक- मालक व कार्यकर्ते यांना कार्यक्रमाच्या वेळी गणेश उत्सवा दरम्यान घ्यावयाची काळजी व उपाय योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले .