जगाचे दुःख निवारण बुद्ध धम्मानेच होते. - भन्ते सोमानंद.



जगाचे दुःख निवारण बुद्ध धम्मानेच होते. - भन्ते सोमानंद.

        

गडचिरोली - मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : पंचशिल बुद्ध विहार रामनगर येथे वर्षावास कार्यक्रम अंतर्गत भन्ते सोमानंद राष्ट्रीय प्रभारी बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क भिक्खू संघ यांनी धम्म प्रबोधन केले. ते संपूर्ण भारत दौऱ्यावर आहेत . बुद्ध गया बौद्धांच्या ताब्यात मिळविण्यासाठी भारतातील बौद्धांना एकत्र करण्याचे काम करत आहेत. 


संपूर्ण बुद्धिष्ट राष्ट्रांचे सहकार्य घेऊन  बुद्ध गया बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी फिरत आहेत . जागतिक स्तराचे आंदोलन उभे करण्याचा त्यांचा उद्देश आहे. या प्रसंगी भन्ते सोमानंद म्हणाले की , बुद्ध धम्म स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्यायावर आधारित आहे . बुद्ध धम्मात सर्व लोक एकसमान आहेत . कोणी उच्च किंवा निच नाहीत . जगातील दुःख निवारण करण्यासाठी तथागत बुद्धाने बुद्ध धम्म दिला.

      

भन्ते सोमानंद  पुढे म्हणाले की , बुद्ध धम्म भारतात  निर्माण झाला आणि जगभर पसरला . भारत ही बुद्धाची विरासत आहे . परंतू बुद्ध धम्म भारतातूनच नष्ट झाला . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टो . १९५६ ला बुद्ध धम्माची दिक्षा घेऊन पुन्हा भारतात बुद्ध धम्माचे पुनर्निर्माण  केले.


नागपूरची दिक्षाभूमी हीसुद्धा बौद्धांच्या ताब्यात नाही. सम्राट अशोकानी ८४ हजार विहार बांधले . ते सुद्धा नष्ट झाले आहेत.अशा अनेक समस्या भारतात निर्माण झाल्या आहेत.ह्या समस्या सोडविण्याची आमची जबबदारी आहे. त्यासाठी भारतातील बहुजनांना एकत्र करणे आवश्यक आहे . असे विचार त्यांनी व्यक्त केले .

          

भन्ते सोमानंद यांनी आतापर्यंत १७ राज्यात फिरून बौद्धांना एकत्र करण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात फिरून बौद्धांना जागृत व एकत्र करण्याचे काम करत आहेत.

        

या कार्यक्रमाचे संचालन डॉ.उज्वला शेंडे यांनी केली प्रास्ताविक नरेंद्र शेंडे यांनी केले.आभार भोजराज कान्हेकर यांनी मानले.या कार्यक्रमाला जनार्धन ताकसांडे,अनिता मोटघरे ,नरेश बांबोळे,पौर्णिमा दुर्गे,सागर मसाळकर , अमर खंडारे , प्रमोद बांबोळे,प्रमोद राऊत , तुळशिराम सहारे , देवाजी भैसारे , ईश्वर उंदिरवाडे , एकनाथ नंदेश्वर 


यज्ञराज जनबंधू , आम्रपाली डोगरे , राधा मेश्राम , राधा नांदगाये , शांतीलाल लाडे , शिशुपाल शेद्रे , पुनम बारसागडे , यशोधरा उंदिरवाडे , तारा रामटेके , शिला शेंडे , अशोक गडकरी , विजया वालदे , कल्पना गेडाम , लिना ढोलणे , विभा उमरे, जनार्धन साखरे आदि उपासक व उपासिका उपस्थित होते .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !