एस.टी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरु ; प्रवासाचे हाल.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
गडचिरोली : संपूर्ण राज्यातील एस.टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या महाराष्ट्र शासन अजुनपर्यंत सोडविल्या नसल्यामुळे ऐन सनासुदीच्या दिवसा पासून एस.टी कर्मचाऱ्यांनी आपला बेमुदत संप पुकारला आहे.त्यामुळे प्रवासाचे हाल होतांना दिसत आहेत.शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे वेतनवाढ नाही.
२०१८ पासुन महागाई भत्याची थकबाकी,घरभाडे भत्ताची थकबाकी,वार्षीक वेतनवाढ व इतर मागण्या शासन दरबारी रेटून सुद्धा शासन एस.टी कर्मचाऱ्यांना लालीपाप देत आहे.मुख्यमंत्री स्तरावर अनेक बैठका हो वुनही तोडगा निघाला नाही त्यामुळे दि. 3 संष्टेबर पासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यानी धरणे आंदोलन करीत आहेत.
एस.टी कर्मचारी संपावर गेल्यामुळे मोजक्याच बसेस सुटत आहेत.ऐन पोळ्याच्या सनाला संपाचे हत्यार सुरु झाले जर का संप पुढे असाच चालला तर गणपती सिझनमधे संप सुरच राहण्याचे चिन्ह दिसत असल्यामुळे चाकरमाने ची पंचायत होणार आहे.