जयहिंद दुर्गा उत्सव मंडळ गांधी चौक गडचिरोली तान्हा पोळा नंदिबैल सजावट उत्सवात तुफान गर्दी.
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : जयहिंद दुर्गा उत्सव मंडळ गांधी चौक गडचिरोली येथे दि. 3 सटेंबर ला मंडळाच्या वतीने तान्हा पोळा भरविण्यात आला.यात वंजारी मोहला,ढिवर मोहला सोना चांदिचे दुकाना पर्यंत ते वडाचे झाडा पर्यंत नंदिबैल सजावट केलेली होती. बघ्याचीही तुफान गर्दी होती.
यात प्रथम बक्षीसॲड. विश्वजित कोवासे ५००१ / द्वितिय बक्षीस राकेशभाऊ नागरे ३००१ / तृतिय बक्षिस अलंकार टेक्सटाईल्स २००१/ तर स्वं. शांताबाई धाईत १००१/ यांचेकडून व इतर बक्षीसाची मेजवाणी ठेवण्यात आली होती. सजावट केलेल्या नंदिबैलाचे परिक्षकाद्वारे योग्य पाहणी करून नंदिबैल सजावट करणाऱ्या लहान मुलांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले . रविभाऊ वासेकर यांनी नंदिबैल सजावटधारक व उपस्थितांचे आभार मानले.