ने.हि.महाविद्यालयाची समीक्षा पंडीत ठरली २१०००/ ची मानकरी : वादविवाद स्पर्धेत अव्वल.

ने.हि.महाविद्यालयाची समीक्षा पंडीत ठरली २१०००/ ची मानकरी : वादविवाद स्पर्धेत अव्वल.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,२४/०९/२४ ब्रह्मपुरीचा महाराजा गणेश उत्सव समितीतर्फे ' जातीनिहाय जनगणना  संविधानाचे उल्लंघन की काळाची गरज? ' या विषयावर भव्य वादविवाद स्पर्धा घेण्यात आली.यात विषयाच्या विरुध्द बाजूने बोलून नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाची कु.समीक्षा प्रकाश पंडीत ही अव्वल ठरुन २१०००/हजाराची मानकरी ठरली.


तिला महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवारांनी २१०००/, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविले.याशिवाय शांताबाई भैया महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.सुषमा ठुसे ही या स्पर्धेत प्रोत्साहनपर बक्षिसाची मानकरी ठरली. तिला रोख १०००/, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन तिचाही गौरव केला गेला.

   

या यशाबद्दल नुकतेच समीक्षा व सुषमाला महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे सचिव अशोक भैयांनी  विशेष भेट देऊन सन्मानित केले.याप्रसंगी प्राचार्य डॉ डी एच गहाणे,उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम उपस्थित होते.याशिवाय प्राचार्य डॉ माधव वरभे,सांस्कृतिक प्रभारी डॉ पद्माकर वानखडे, डॉ हर्षा कानफाडे, मराठी विभागप्रमुख डॉ धनराज खानोरकर, डॉ प्रकाश वट्टी, डॉ कुलजित शर्मा,प्रा जयेश हजारे, डॉ आशिष साखरकरांनी दोघीचेंही विशेष अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

     

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.राजेंद्र डांगे तर आभार डॉ भास्कर लेनगुरेनी मानले.कार्यक्रमाला महाविद्यालयाचा प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी बहूसंख्येने उपस्थित होता.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !