श्रीलंके वरून आणलेल्या अस्थि चे हजारोच्या संख्येने बौद्ध बांधवांनी घेतले ; तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,२७/०९/२४ श्रीलंके वरून महाकारूणिक तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पवित्र अस्थी दर्शन महायात्रा रथ ऐतिहासिक चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यातील शहरातुन प्रवास करीत प्रथमच ब्रह्मपुरी शहरात आले.सोबत तथागताच्या सदधर्माचे सरसेनापती त्यांचे प्रमुख शिष्य भंते सारीपुत्र व महा मोगलायन यांचे अस्थिधातू सुद्धा दर्शनासाठी आणली होती.
अस्थिधातूची महायात्रा रथ भीम चौक गुजरी वार्ड, ब्रह्मपुरी येथे दर्शनासाठी आणल्यानंतर वार्डातिल , ब्रह्मपुरी शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील बौद्ध उपासक, उपासीकांनी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन धन्यता मानली.
भीम चौकातून निघालेली अस्थि दर्शन महायात्रा रथ विद्यानगर येथील त्रिरत्न विहार येथे आल्यानंतर बौद्ध उपासक सन्मा. देवेश कांबळे,प्राचार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,ब्रह्मपुरी,आसारामजी बोदेले, माजी प्राध्या.रामटेके सर,पत्रकार विजय रामटेके, प्रशांत डांगे,अमरदीप लोखंडे व हजारो उपासक, उपासिका यांनी जय घोषाने, जल्लोषात अस्थिकलश रथाचे स्वागत करून अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
अस्थि कलश दर्शन घेताना वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन व वाहतूक शाखा कर्मचारी यांनी वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.. अस्थिकलश दर्शन घेण्यास मोठे सहकार्य केले.त्रिरत्न विहार या ठिकाणावरून अस्थि दर्शन महायात्रा रथाने अर्जुनी (मोरगाव)भंडारा जिल्हा या ठिकाणाकडे प्रस्थान केले..