विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे विहिरगाव येथे आर्थिक मदत.
एस.के.24 तास
सावली : दिनांक : १६ सप्टेंबर २०२४ सावली तालुक्यातील मौजा.विहिरगाव येथे कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या कुटुंबियाना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे विहिरगाव येथील जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता दिलीप फुलबांधे व कुस्माकर वाकडे यांच्यात वतीने सदर मदत देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की,मौजा.विहिरगाव येथील गुलाब धर्मा भोयर वय ५६ हे भूमिहीन शेतमजूर आहेत घरातील आर्थिक स्थिती नाजूक असून मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.मागील काही दिवसापासून वारंवार तबेत खराब असल्याने ते दवाखान्यात उपचारासाठी भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना कर्करोग असल्याचे सांगितले त्यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळाली राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून तात्काळ सदर मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना व्याहाड तालुका अध्यक्ष नितीन गोहने,बोथलीचे उपसरपंच नरेश पाटील गड्डमवार,जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता काशिनाथ मोटघरे,प्रमोद उंदीरवाडे,शरद धारणे,विनोद वाकडे,विलास भरडकर,लोमेश टेम्भूर्णे,देविदास बारसागडे आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.