ने.हि.महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा: उत्कृष्ट खेळाडूंसाठी बक्षीस वितरण.

ने.हि.महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा: उत्कृष्ट खेळाडूंसाठी बक्षीस वितरण.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रह्मपुरी : दिनांक, ०२/०९/२४ येथील ने. हि. महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस मेजर ध्यानचंद जयंती तसेच सेमिनार मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे, डॉ. सुभाष एम. शेकोकर, उपप्राचार्य तथा शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, क्रीडा समिती अध्यक्ष डॉ.एम. ए.शेख


डॉ.धनराज खानोरकर, डॉ.मिलिंद पठाडे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमांची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यर्पण व पाहुणाच्या स्वागताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.गहाणेंनी, मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि खेळाडूंच्या शुभेच्छा दिल्या. 

     

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाविद्यालयात दि. २१ ते २९ दरम्यान विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या ,या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पाहुण्यांचे हस्ते पारितोषिक देण्यात आले.सत्र २०२३-२४मधील राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे संचालन डॉ.के.एम.शर्मा व प्रास्ताविक डॉ. सुभाष एम. शेकोकर तर आभार  श्री.संजू मेश्राम यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला  महाविद्यालयातील क्रीडा समिती सर्व सदस्यगणं,प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यशस्वीतेसाठी विकास पाटील, खेळाडू विद्यार्थिनी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !