मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
चंद्रपूर : चिचपल्ली गणन मलिक फाऊंडेशन नवि दिली शाखा चंद्रपूर व बौद्ध बांधव चिचपल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सम्राट अशोक हायस्कुल चिचपल्ली येथे रमेशचंद्र राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तथागत भगवान बुद्ध यांच्या बुद्ध मुर्तीचे वितरण तथा धम्म प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
या धम्म प्रबोधन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना धम्मदुत तथा अभिनेते गगण मलीक यांनी सांगितले की सम्राट अशोकांनी ८४ हजार स्त्युपाची स्थापना केली आणि बौद्ध धम्माचा प्रचार देश विदेशात पोहचविला , बौध धम्माचे अनुकरण विदेश्यात जोमाने सुरु आहे परंतु ज्या भारत देशात बुद्धाचा जन्म झाला आणि बौद्धत्व प्राप्त झाले त्याच भारत देशात बौध्द धम्म लयास गेला भारत देश हा बौद्धाचा देश परंतु त्याकडे पुर्णतहा दुर्लक्ष झाले परंतू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौध धम्माला पूर्नजिवित केले.
आणि संपूर्ण भारत बौद्धमय करेन अशा संकल्प करून १९५६ ला बौद्ध धर्माची दिक्षा घेतली व अल्पावधितच बाबासाहेबांचे निधन झाले त्यांचा महापरिनिर्वानानंतर संपूर्ण भारत बौद्धमय करण्याची जबाबदारी आंबेडकर अनुयायीवर आली.परंतु बौध बांधवाच असंसंघटिक पणामुळे पुर्ण झाले नाही.
सम्राट अशोकांना च्या ८४ हजार स्त्युपाची संकल्पना पूढे ठेवून हजार बौद्ध मुर्त्याचे वाटप करून भारतातील ८४ हजार विहारांना एकत्रित आणून भारत बौद्धमय निर्धार करून बाबासाहेबचे स्वप्न पुर्ण करणे हेच माझेअंतिम ध्येय आहे असे गगन मालिक यांनी आर्वाजुन सांगीतले.
कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे हे लाभले होते.तर पुज्य भन्ते सुमन वण्णो व भन्ते गण उपस्थित होते. धम्मसेविका पपिताताई कुमरे यांनी बौद्ध धम्मावर आपले विचार व्यक्त केले.मुख्य आयोजक सारंग राऊत , विनोद देशपांडे ,प्रा.दुषंत नगराळे आदि लाभले होते.
कार्यक्रमात विकास राजा यांच्या बुद्ध - भिम गिताच्या बहारदार कार्यक्रमाने रंगत आणली. कार्यक्रमास पियुष गेडाम,सिद्धार्थ शेंन्डे , डॉ. प्रणय गेडाम ' पराग कांबळे , गोपाल रायपूरे प्रा. मुनिश्वर बोरकर , वाघमारे आदि सहीत चिचपल्ली परिसरातील बहुसंख्य उपाषक - उपाषिका प्रामुख्याने उपस्थित होते.