शासकीय रिक्त पदे भरण्यात यावीत ; कृतिसंसाधनचे यशवंत खोब्रागडेंची मागणी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०९/०९/२४ गावागावात शिक्षण घेतलेले अनेक तरुण , तरुणी बेरोजगार असून हाताला काम नाही त्यामुळे हताश झाले आहेत. अनेक कार्यालय फारच कमी मनुष्यबळावर कसेतरी काम करत आहेत.म्हणून शासनाने शासकीय रिक्त पदे त्वरित भरावी.
यासाठी कृतिसंसाधन समिती ब्रम्हपुरी द्वारा यशवंतराव खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी,पर्वनी पाटील यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतेच निवेदन पाठविण्यात आले.
यावेळी पेट्रोल,डिझेल दर कमी करावे अशी मागणीही करण्यात आली. उपविभागीय अधिकारी परवीनी पाटील यांना निवेदन देतेवेळी यशवंतराव खोब्रागडे, जनबंधु बागडे उपस्थित होते.