उत्तर नागपूर विधानसभा संयुक्त रिपब्लिकन आघाडी लढवणार ; रिपाईचे सर्व गट एकत्र नो कांग्रेस नो भाजपा फक्त रिपब्लिकन.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
नागपूर : रविभवण येथे आज शुक्रवार दिनांक ०६/०९/२०२४ ला दुपारी १:०० वाजता संयुक्त रिपब्लिकन आघाडी ची बैठक संपन्न झाली.सभेच्या अध्यक्ष स्थानी आघाडीचे अध्यक्ष अमृतराव गजभिये होते.त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उत्तर नागपूर विधानसभेची निवडणूक रिपाईआघाडीच्या वतीने लढवण्यात येईल असा निर्धार ठरावाद्वारे मंजूर करण्यात आला.या ठरावाद्वारे असाही नारा मंजूर करण्यात आला " नो काँग्रेस नो भाजप ओन्ली रिपब्लिकन कारण आंबेडकरी जनतेनी कांग्रेसलाही चाचपून पाहीले.
दगडापेक्षा विट मऊ परंतु कांग्रेसनेही आंबेडकरी जनतेला मुर्ख बनविण्याचे कारस्थान लोकसभा निवडणुकीत केले. निवडणुकीची तयारी म्हणून लवकरच उत्तर नागपुरात जनसंवाद जनसंपर्क यात्रा काढण्यात येणार आहे.
तसेच येणाऱ्या२९ सप्टेंबर२०२४ ला " उत्तर नागपूर येथे* रिपब्लिकन निर्धार मेळावा घेण्यात येणार आहे "
सभेत प्रत्येक सदस्यांनी " निळी टोपी टाकणारा काँग्रेसी असो वा भाजपाई असो हा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता " होवू शकत नाही.असा सूर काढला.व याच सुराचे रूपांतर निवडणुकीमध्ये या स्लोगन मध्ये करून त्याचा प्रचार करण्यात येणार आहे.सभेला खालील प्रमाणे आघाडीचे घटक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अमृतराव गजभिये,डॉ.प्रदीप बोरकर,दिनेश गोडघाटे, कैलाश बोंबले, विश्वास पाटील,प्रकाश कुंभे,राज सुखदेवे,दिनेश अंडर सहारे,बाळूमामा कोसमकर,विनायकराव जामगडे अनिल मेश्राम,डॉ.चरणदास जनबंधू,दीपक डोंगरे,शेखर पाटील,मनोज कुमार,मनोहर गायकवाड,शरद देशभ्रतार,सुरेश बोंदाडे,विनोद पाटील, चुडामन हटवार,ईश्वर सुर्यवंशी
हंसराज मेश्राम,पुरुषोत्तम पांडागले,शेषराव गणवीर,रमेश गेडाम,मोरेश्वर दुपारे, ऍड.भीमराव कांबळे,रत्नमाला गणवीर,शरद गडपायले,राजू फुलके,शैलेश गुळदे,गौतम सातपुते,धर्मेंद्र मडामे,आणि इतर सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते . बैठकीचे आभार प्रकाश कुंभे यांनी मानुन हेच रिपब्लिकन एक्याचे लोन संपूर्ण विदर्भात इतरही कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहनही प्रकाश कुंभे यांनी केले.