पोळा सणावर शोकाचे सावट ; बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा मृत्यू.

पोळा सणावर शोकाचे सावट ; बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा मृत्यू.


एस.के.24 तास


बुलढाणा : शेतकरी आणि बैलाचा सण असलेल्या पोळा सणानिमित्त बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.दोन्ही मृत युवा शेतकरी पुत्र मलकापूर तालुक्यातील आहे.  पोळ्याच्या सणाला शोककळा पसरली आहे.


सोमवार दिनांक,२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात पोळ्याची धूम सुरू असताना दोन युवक पाण्यात बुडून दगावले. दोघांचे मृतदेह हाती लागले असून त्यांच्या मूळ गावात पोळा सणाच्या उत्साहावर विरजण पडले आहे.मलकापूर तालुक्यातील मलकापूर ते बोदवड (जिल्हा जळगाव) मार्गावरील दोन गावात ह्या दुर्घटना घटना घडल्या. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार हरणखेड (तालुका येथील मलकापूर,जिल्हा बुलढाणा) येथील शेतकरी गावा नजीकच्या व्याघ्र व्याघ्रा नाल्यात बैल धुण्यासाठी गेले होते. 


दरम्यान जोरदार पावसामुळे व्याघ्रा नाल्याला अचानक मोठा पूर आला.यावेळी बैल धुत असलेला गोपाल प्रभाकर वांगेकर वय,25 वर्ष हरणखेड तालुका,मलकापूर जिल्हा, बुलढाणा वाहून गेला व दगावला.


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या बचाव पथकाने शोध घेऊन गोपाल वांगेकर याचा मृतदेह बाहेर काढला.  मार्गावरील देवधाबा येथील घटनेत बत्तीस वर्षीय युवा शेतकरी दगावला आहे.बैल धुण्यासाठी खडकी नाला मध्ये इतरासह तो देखील गेला होता. पाण्याचा प्रवाह जोराचा असल्याने तो वाहून गेला. 


प्रवीण काशिनाथ शिवदे वय,32 वर्ष राहणार देवधाबा तालुका मलकापूर,जिल्हा बुलढाणा) असे मृत युवा शेतकऱ्याचे नाव आहे. देव धाबा गावातील पोहण्यात तरबेज गावकऱ्यांनी प्रवीण चा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान या दुर्दैवी घटनेने वांगेकर आणि शिवदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात एकच आकांत उसळला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !