शिवसेना (ठाकरे गटाचे) जिल्हाध्यक्ष,सुरेंद्र चंदेल ची बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी गुन्हा दाखल. ★ पत्रकार परिषदेत,निताराम कुमरे यांची माहिती.

शिवसेना (ठाकरे गटाचे) जिल्हाध्यक्ष,सुरेंद्र चंदेल ची बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी गुन्हा दाखल.


पत्रकार परिषदेत,निताराम कुमरे यांची माहिती. 


 मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


गडचिरोली : गोंड - गोवारी,आदिवासी जमातीत अनेक गैरआदिवासी बोगस प्रमाणपत्र मिळवून नोकरीत आहेत तर काही राजकारणाचा फायदा घेत आहेत.अश्यातच कुरखेडा येथील रहिवासी शिवसेना (उबाठा) गटाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष, सुरेंद्र चंदेल यांनी बोगस जातीचे प्रमाणपत्र सादर करून मी एस.टी.आहे.

असे भासवून निवडणुक लढविली होती.परंतु यांची खरी जात कोणती म्हणून याचिका कर्त्यानी हाय कोर्टात धाव घेतली असता उच्च न्यायालयाने चंदेल यांची जात छत्री आहे.ती बोगस जात असल्याचा निवाळा दिल्यामुळे बोगस जातीचे प्रमाणपत्र दाखविल्या मुळे एस.डी.ओ.कुरखेडा यांची फसवणूक केल्यामुळे त्यांनी चंदेल यांचे विरुद्ध कुरखेडा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या रिपोर्टनुसार त्यांचेवर गुन्हा दाखल झालेला आहे.


प्रेस क्लब च्या पत्रकार परिषदेत पुराव्यानिसी माहिती सांगतांना ट्रायबल ऑफिसर्स फोरम चे कोषाध्यक्ष, तथा सेवानिवृत पोलीस अधिक्षक,निताराम कुमरे (चिखली) शिवराम कुमरे,गुलाबराव मडावी,आनंद कंगाले आदि प्रमुख उपस्थित होते. 


सविस्तर वृत असे की कुरखेडा येथील गडचिरोली जिल्हाचे शिवसेना (ठाकरे) गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी बिहिकटोला कोरची तालुका येथून छत्री जातीचे प्रमाणपत्र मिळवून छत्री जात ही आदिवासी जमातीत मोडतो म्हणुन ते 2007 ला एस.डी.ओ.वडसा यांचे कडून छत्री जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले होते. 


व गेवर्धा जि.प.क्षेत्रातून निवडणुक लढविली होती. परंतु पळताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र रद केले होते.म्हणुन चंदेल यांनी हायकोर्ट नागपूर  येथे रिट. पिटिशन क्रंमाक 43 66/2007 अन्वये प्रकरण दाखल केले होते.


परंतु ते उच्च न्यायालयाने रद्द केले. पुन्हा चंदेल यांनी सुप्रिम कोर्टात SLP क्रमांक 3 4 3 4 5 / 2209 अन्वये अपील दाखल केली होती परंतु सुप्रिम कोर्टाने सुद्धा रद्द केली.तरी सुद्धा चंदेल यांनी 2016 ला एस.डी.ओ.कुरखेडा येथे छत्री जातीचे प्रमाणपत्र खोडतोड करून सादर केले होते. 


तिथेही त्याचे अर्ज रद्द केले व जात पळताळणी कडे अर्ज सादर करावे असे निर्देश दिले होते.परंतु चंदेल यांनी अपील केले नाही.अश्यातच विधानसभेच्या निवडणुका घोषीत झाल्यात व आचारसहीता सुरु झाली.


अश्यातच त्यांनी छत्री जाती च्या प्रमाणपत्र एस.डी.ओ.कुरखेडा कडून प्राप्त करून आरमोरी विधानसभा अनु.जा.राखीव म्हणुन निवडणुक लढविली होती. 


व त्यानंतर जात पडताळणी समिती गडचिरोली यांनी चंदेल यांचे छत्री जातीचे जात प्रमाणपत्र रद्द केले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एस.डी.ओ. कुरखेडा यांनी कुरखेडा पोलिस स्टेशन येथे कार्यालयाची फसवणुक केली. म्हणुन रिपोर्ट दिला असता सुरेंद्र चंदेल यांच्या विरोधात अपराध नंबर १५५ /२०२४ कलम ४२०, ४६५ , ४६६ , ४६८ , ४७१ भादवी प्रमाणे दि.२८/०८/ २०२४ ला गुन्हा दाखल केला.


असून कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार वाघ हे अधिक तपास करीत असुन अजुन पर्यंत अटक झालेली नाही.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !