अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या संघर्षाला यश : सरपंच व उपसरपंचाच्या मागण्या अंशतः मंजूर.

अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या संघर्षाला यश : सरपंच व उपसरपंचाच्या मागण्या अंशतः मंजूर. 


राजेंद्र वाढई : उपसंपादक


राजुरा : अखिल भारतीय सरपंच परिषद संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील, राज्य सल्लागार प्रा. राजेंद्र कराडे, विदर्भ अध्यक्ष अँड. देवा  पाचभाई यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे आझाद मैदानावर सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना घेऊन भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. 


पहिल्यांदाच गाव गाडा चालवणारा कारभारी मुंबई सारख्या राज्याच्या राजधानीत येऊन आपले हक्क, अधिकार मिळवून घेण्यासाठी एकवटला. या सर्व सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा रोष पाहता सरकार हादरले. 


पंचायत राज व्यवस्थे मधला शेवटचा घटक म्हणजे ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतचा कारभार करणे एढया गबाढयाच काम नाही. त्या सरपंचांना होणारा मानसिक त्रास बघता भल्या भल्या राजकीय पुढार्यांना घाम फुटतो. सरपंच हा 24 तास काम करणारा लोकप्रतिनिधी आहे परंतु त्यांना अधिकार मात्र शुन्य आहे.फक्त आलेल्या कामाची अंमलबजावणी करायची एवढे च काम ग्रामपंचायत मधील सरपंचांना आहे. 


म्हणून अखिल भारतीय सरपंच परिषद च्या माध्यमातून गाव खेड्यातील सरपंच व उपसरपंच यांनी आरपारची लढाई सुरू केली आणि मुंबई गाठली त्यामुळे सरकारला चपराक बसली सरकार हे सरपंच बघुन मंत्रीमंडळ हादरले म्हणून मंत्रिमंडळांनी गावाचा कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यांची मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सरपंच उपसरपंच यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. 


जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना याचा लाभ होणार आहे. सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे मानधन दुप्पट करण्यात आले असून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकाच पदावर आणण्यात आली आहेत.ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 75000 आहे त्याला दहा लाख मिळतात 75 हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम असलेल्या 15 लाख रुपयांची बांधकामी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

          

आता महिन्याला मानधन किती ? राज्यात सरपंच आणि उपसरपंचाच्या पगारात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. याबाबत  मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील ज्या ग्रामपंचायतची लोकसंख्या दोन हजारापर्यंत आहे. त्या सरपंच आणि उपसरपंचाचे  मानधन व ग्रामपंचायत सदस्य यांचा मासीक भत्ता दुप्पट करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे सरपंचाचे मानधन 3000 वरून 6000 रुपये करण्यात आले आहे. 


त्यामुळे उपसरपंचांचे मानधन 1000 रुपयावरून दोन हजार रुपये करण्यात आली आहे तसेच ज्या ग्रामपंचायतची लोकसंख्या 2000 ते 8000 दरम्यान आहे त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे मानधन 4000 वरून 8000 रुपये आणि उपसरपंचाचे मानधन 1500 वरून 3000 रुपये करण्यात आले आहे सरपंचांचे मानधन 5000 वरून दहा हजार रुपये आणि उपसरपंचाचे मानधन दोन हजार वरून चार हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


राज्यातील सरपंच उपसरपंच मध्ये आनंदाचे वातावरण असले तरी ग्रामपंचायत मध्ये अनेक अडचणी आहेत त्या करिता सरपंच उपसरपंच यांना नेहमीच दक्ष राहावे लागणार आहे व येणाऱ्या काळात सुध्दा आपण सर्वांनी संघटीत राहुन पुढची लढाई न्याय हक्कासाठी लढण्याची आहे तुर्तास मंत्रीमंडळात काही निर्णय घेण्यात आले त्या बद्दल आनंद आहेत. 


आम्ही गाव गाडा चालवणाऱ्या सर्व सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी संघटीत होऊन जोरदार राज्याची राजधानी मुंबई येथे सरपंच उपसरपंचा च्या मागण्यांसाठी एकत्रित झाले गाव गाड्या चा कारभारी सुध्दा मुंबई ला येऊन आपले हक्क अधिकार मागु शकतो हे मुंबई ला महामोर्चा च्या माध्यमातून दाखवून दिले.


तेव्हा राजकीय व्यवस्थेला कढुन चुकले की पंचायत राज व्यवस्थे मधला शेवटचा घटक म्हणजे ग्रामपंचायत आहे आणि मधील लोकप्रतिनिधी म्हणजे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आहेत यांच्या वर जर अन्याय झाला तर हे सत्तेचे पानीपत केल्या शिवाय राहणार नाही. 


म्हणून त्यांनी हि गाव खेड्यातील खदखद बघता या आंदोलनाची दखल घ्यावी लागली  मानधन वाढीसह आणखी काही निर्णय घेतल्याबदल निश्चितच सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय सरपंच संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष,नंदकिशोर वाढई यांनी व्यक्त केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !