राजुरा तालुक्यातील कळमना येथुन स्वच्छता ही सेवा अभियानाला शुभारंभ.
राजेंद्र वाढई : उपसंपादक
राजुरा : स्वच्छता ही सेवा अभियाना चा आज शुभारंभ जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये करण्यात आला. या अंतर्गत राजुरा तालुक्यातील ग्रामपंचायत कळमना येथील गावकऱ्यांच्या सहभाग व श्रमदानातून गाव स्वच्छ करण्यात आले. यावेळी गावात स्वच्छते विषयी सातत्य राखण्यासाठी व शाश्वत स्वच्छता निर्माण करण्यासाठी लोकांनी स्वतःहून सहभागी होणे फार गरजेचे आहे असे मत गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांनी व्यक्त केले.
तर उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांनी गाव स्वच्छ, सुंदर व पर्यावरण मुक्त, हिरवेगार करण्यासाठी गावातील जेष्ठांपासून ते महिला व युवक वर्ग तत्परतेने सेवा देण्यासाठी पुढाकार घेत असतात त्यामुळेच आम्ही आमचे गाव सुंदर निर्मळ करण्यात यशस्वी होऊ शकलो आहे अशी भावना बोलून दाखवली.
या प्रसंगी विस्तार अधिकारी रत्नपारखी, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, ग्रा.प.सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंजना दिवाकर पिंगे, मुख्यध्यापिका दुधे मॅडम, जेष्ठ नागरिक उध्दव आस्वले, देवाजी चाफले, ग्रामसेवक मरापे, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते सुरेश गौरकार, विठ्ठल वाढई, ग्राम संघाच्या अध्यक्ष मीना भोयर
उमेद सखी संगीता उमाटे, सपना मेश्राम, शोभा गेडाम, शोभा आत्राम, सुनिता झाडे, सखाराम भोयर, पंडित गेडाम, कवडु मुठलकर, निलकंठ घाटे, शामराव चापले, मोतीराम झाडे, नानेबाई मेश्राम, शंकर गेडाम, एकनाथ भोयर ,क्षावण गेडाम, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे यासह बचट गटाच्या महिला, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते व गावातील स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.