धम्मभाव निर्माण करणे व मानवी समुदयास एकत्रीत करणे हाच बुद्धाच्या अस्थिकलशाचा उद्देश. - भन्ते रेवत श्रीलंका
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
गडचिरोली : वडसा येथे तथागत बुद्धाच्या व बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे आगमन होताच अनेकांनी दर्शन घेतले.तथागत बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे नवेगांव कॉम्पेक्स , गांधी चौक गडचिरोली व फवारा चौक देसाईगंज येथे अस्थिकलस व धम्मदेशना कार्यक्रम इंडो एशिया मेथ्या फाऊंडेशन च्या वतीने पार पडला.
श्रीलंका वरुन तथागत बुद्ध व डॉ.आंबेडकर यांच्या अस्थिकलश महायात्रा चंद्रपूर ते मुल सावली व्याहाड , नवेगाव कॉम्लेक्स गांधी चौक गडचिरोली ते फवारा चौक देसाईगंज पर्यंत ठिकठिकाणी बुद्धाच्या अस्थिकलशाचे हजारोच्या संख्येनी दर्शन घेतले. सदर महायात्रा सोबत पुज्य भन्ते रेवत पलामोधम्मो श्रीलंका , भन्ते प्रियदर्शनी , प्रज्ञापाल,भन्ते ज्ञानज्योती ,नितिन गजभिये व स्मिता वाकडे नागपूर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना पुज्य भन्ते रेवत म्हणाले की धम्मभाव निर्माण करणे व मानवी समुदयाला एकत्रित करणे हाच उद्देश तथागत बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलस महायात्रा दर्शनाचा होता. यातूनच पंचशिलाचे पालन होइल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला जो धम्म दिला त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य या धम्म यात्रेद्वारा करता येईल.या प्रसंगी प्रा.डॉ.देवेश कांबळे,गोपाल रायपुरे ॲड.विनय बांबोळे यांचेही बौद्ध धम्माप्रती मार्गदर्शन लाभले.
मुल,गडचिरोली ते वडसा,पर्यंत धम्म यात्रेचे मुख्य आयोजक धम्मबंधु गोपाल रायपूरे ॲड. विनय बांबोळे प्रा. मुनिश्वर बोरकर हे होते तर पंडीत फुलझेले,मारोती भैसारे ,अरुण शेन्डे,मिलिंद भानारकर इंजि.निलकंठ पोपटे , संतोष बहादुरे,सुबोध मेश्राम,सुरज बहादुरे,जगदिश तामगाडगे वडसा,
विजय रामटेके , विकास डांगे,जिवन बागडे ब्रम्हपुरी हेमंत मेश्राम,विनोद जांभुळकर,अमोल मेश्राम,रुपेश सोनटक्के,ज्ञानेश्वर मुजुमकर , कविश्रर झाडे , किशोर उंदिरवाडे, नाजुक भैसारे आदीचे मोलाचे सहकार्य लाभले महायात्रा दर्शनास बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.