व्याहाड बुज.येथील जिल्हा परिषद शाळेत व अंगणवाडीत नोटबुक पुस्तक,पेन,खाऊचे चे वितरण
सुदर्शन गोवर्धन ! प्रतिनिधी
सावली : व्याहाड बुज येथील आदर्श शिक्षक स्मृतीशेष तुळशीराम भिवाजी गुरनुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथिल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तथा अंगणवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक, पुस्तक , पेन व खाऊचे वितरण तथा शिक्षक वर्गाला पेन चे वितरण करण्यात आले.
स्मृतीशेष तुळशीराम भिवाजी गुरनुले हे एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्या हयातीत जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे सत्कार करण्यात आलेला होता . त्यांचे निधन तीन वर्षांपूर्वी झाले . त्यावेळेस सुद्धा त्यांचे चिरंजीव प्राध्यापक माधव गुरनुले (आर्ट कॉमर्स एंड सायन्स कॉलेज चंद्रपूर) अनिल गुरनुले (अध्यक्ष - महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ सावली तालुका) संजय गुरनुले (अध्यक्ष माळी समाज व्याहाड बूज.) यांनी परंपरागत तेरवी चा कार्यक्रम न करता समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करून एक आदर्श समाजासमोर ठेवलेला होता.
तेव्हापासूनच आदर्श व्यक्तिमत्व समोर ठेवून त्यांनी स्मृतीशेष श्री तुळशीरामजी गुरनुले यांच्या स्मृती पित्यर्थ दरवर्षी येथील शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण करण्यात येते.
कार्यक्रमाला प्राध्यापक अरुण धानोरकर (टेक्निकल कॉलेज चंद्रपूर)श्री संघपाल भगत ( प्रिन्सिपाल नवभारत विद्यालय व्याहाड बुज.सौ.वंदनाताई गुरनुले (माजी सरपंच व्याहाड बु) सौ.संगीताताई गुरनुले चंद्रपूर,संभाजी मेश्राम (अध्यक्ष पालक संघ जि.प.उच्च प्राथमिक शाळा व्याहाड बूज.) सौ. गोर्लावार (मुख्याध्यापिका जि प उच्च प्राथमिक शाळा व्याहाड बूज.) कवडू ठाकूर (तंटामुक्ती अध्यक्ष ) , शंकर मेश्राम शिक्षक , ठामदेव मोहुर्ले ( माजी माळी समाज अध्यक्ष) नागोबाजी गुरनुले , महादेव लेनगुरे , प्रकाश गुरनुले,दीपक गद्देवार
बंडू चिप्पावार , योगेश निकोडे , संतोष पुण्यप्रेड्डीवार , धनराज गुरनुले, जिल्हा परिषद पालक संघाचे काजल टेकाम , रूपाली भोयर , प्रणिता तोडेवार , नगीना गेडाम , प्रशांत सूत्रपवार , प्रकाश गेडाम , ज्ञानेश्वर बोलीवार तथा सर्व विद्यार्थी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक माधव गुरनुले , अनिल गुरनुले , संजय गुरनुले यांनी केलेले होते . विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रा. माधव गुरनुले यांनी केले . कार्यक्रमाचे संचालन अनिल गुरनुले तथा आभार प्रदर्शन संजय गुरनुले यांनी केले.