गोंदिया जिल्हा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी ; " भ्रष्टाचारी महायुती सरकारला घेऊन जा गे मारबत…” निषेध केले.

गोंदिया जिल्हा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी ; भ्रष्टाचारी महायुती सरकारला घेऊन जा गे मारबत…” निषेध केले.


एस.के.24 तास


गोंदिया : भ्रष्टाचारी महायुती सरकारला घेऊन जा..गे.. मारबत…. महाराजांचा अनादर करणाऱ्या सरकारला घेऊन जा..गे.. मारबत. 


बदलापूर, आकोलातील चिमुकल्या विद्यार्थिनीची रक्षा न करू शकणाऱ्या खोके सरकारला घेऊन जा.. गे.. मारबत.. अश्या आगळ्या वेगळ्या राजकीय घोषणा देत 


आज मंगळवार ०३ सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्हा काँग्रेस, युवक काँग्रेस तसेच एन.एस. यू.आय.च्या कार्यकर्त्यांनी मारबतच्या दिवशी गोंदिया जिल्हा काँग्रेस सरचिटणीस निलम हलमारे मित्र परिवाराने गोंदिया शहरातील सिविल लाइन, मामा चौक, शास्त्रीवॉर्ड,गांधी वार्ड येथे मारबत ची मिरवणूक काढली व विश्रांती करिता मारबत थांबत असलेल्या प्रत्येक चौकात महाराजांचा अनादर करणाऱ्या सरकारला घेऊन जा.. गे.. मारबत व बदलापूर घटनेवर गप्प असलेल्या सरकारला घेऊन जा.. गे…मारबत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अश्या घोषणा देण्यात येत होते.


गोंदिया जिल्हा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी बदलापूर दोषींवर कारवाई व्हावी या उद्देशाने ही मारबत काढून भाजपा आणि राज्यातील महायुती सरकारचा निषेध केला. या प्रसंगी गोंदिया जिल्हा काँग्रेस सरचिटणीस निलम हलमारे, जिला सचिव विजेंद्र बरोंडे, जिल्हा उपाध्यक्ष विक्की गोहरे, एन. एस. यू. आय. चे जिल्हा उपाध्यक्ष राहुल बावनथडे, शहर अध्यक्ष कृष्णा बिभार, शिवम कारोसिया, अभिजीत रघुवंशी, अक्षय गद्दालवार, गौरव बरोंडे, नरेश मोगरे, विवेन फ्रांसेस, रवि परिवार, गोपाल गराडे व इतर कार्यकर्ता उपस्थित होते.


मारबत सणावर विधानसभा निवडणुकीचे सावट : - 


गोंदिया जिल्ह्यात यावर्षी साजरा करण्यात आलेल्या मारबत या सणावर महाराष्ट्र राज्यात पुढील होणार्‍या विधानसभा निवडणुकीचे सावट दिसून आले राजकीय पक्षांनी या संधीच्या फायदा घेत राज्यात सध्या गाजत असलेल्या विषयांना हात घातला त्यात काँग्रेसने बदलापूर आणि अकोला येथील विद्यार्थिनी वर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि मालवण येथील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय उपलब्ध करून राज्य सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. 


एकंदरीत गेल्या काही दिवसापासून गोंदिया जिल्ह्यात विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) गट आणि शिवसेना (उबाठा) हे तिन्ही पक्ष राज्य सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत.त्यामुळे जिल्ह्यात मागील दिवसात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस चे आंदोलन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या प्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट आणि शिवसेना ( उबाठा) चे आंदोलन दिसून आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !