नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना न्याय दया. - डॉ.संजय घाटे

नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना न्याय दया. - डॉ.संजय घाटे

   

राहुल सोमनकार !! तालुका प्रतिनिधी !!


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सतत होणाऱ्या वाघाच्या हल्यात निष्पाप शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागत आहे, जिल्ह्याला लागून ताडोबा अभयारण्या असल्याने गावामध्ये वाघाचा प्रचंड धुमाकूळ आहे.प्रत्येक गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना वाघाच्या दहशतीत जीवन जगणे व शेती करणे धोकादायक आहे. 


आतापर्यंत वाघाने अनेक लोकांचे बळी घेतले असून त्यांना अल्पशा नुकसान भरपाई देवून त्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. याची दखल घेत बहुजन समता पर्व व भारतीय ओबीसी परिषद चंद्रपूर चे अध्यक्ष डॉ. संजय घाटे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक, ०९/०९२०२४ ला मा.जिल्हाधिकारी श्री.विनय गौडा चंद्रपूर व वन मुख्य संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर चंद्रपूर यांना  शेतकऱ्यानी निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या विविध समस्या वर चर्चा करून खालील मागन्या करण्यात आले.


१) वाघाच्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला १ कोटी रुपये देण्यात यावे. 


२) कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नौकरी देण्यात यावी. 


३) वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या व्यक्तीना २५ लाख रुपये देण्यात यावे. 


४) शेतकर्यांच्या जनावरे चराई करीता चराई क्षेत्र राखीव ठेवण्यात यावे. 


५) शेतकर्यांना शेती करण्यासाठी प्रति एकरी १०००० दहा हजार रुपये बिन व्याजी  कर्ज वितरण करण्यात यावे. 


६) जंगलालगत पिढ्यानुपीढ्या शेती करणाऱ्या  शेतकऱ्यांना कायदेशीर पट्टे देण्यात यावे. 


अशा विविध मागण्या घेऊन बहुजन समता पर्व व भारतीय ओबीसी महापरिषद चंद्रपूर कडून निवेदन देण्यात आले. 

 श्री.विजय जी नळे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व उपाध्यक्ष बहुजन समता पर्व,नंदू बारस्कर,विकास ठाकरे माजी सरपंच,डॉ.गजानन चौधरी,सतिश चौधरी सरपंच, टेकाडी,सुधीर गोवर्धन,सुरेश कावळे,योगेश निकोडे, प्रशांत ठाकरे,राहुल सोमनकार देवाडा,रमेंश नैताम सातारा,प्रभाकर मेश्राम,ईश्वर पिपरे,सुखदेव भोयर,सचिन निंबाळकर सहसचिव,क्षत्रिय माळी समाज चंद्रपूरबंटी घाटे अध्यक्ष केमिस्ट व  ड्रगिस्ट असोसिएशन जिल्हा चंद्रपूर ,आशिष गौरकार,खलील शेख उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !