आरक्षण रद्द करू असे म्हणणारे कांग्रेस नेते राहुल गांधी यांचा केला बिजेपीने निषेध ; १०० वेळा संविधानातील कलमाची तोडफोड करणारे कांग्रेसवाले आता आरक्षण संपवायला निघाले. - जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - कांग्रेसचे सरकार असतांना संविधानाच्या शंभर कालमा दुरस्त्या करून आपल्या सोयोनुसार संविधानाची तोडफोड केली. आता तर कांग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणतात की आमचे सरकार आले तर आरक्षणच रद्द करू हे काय आरक्षण आणि संविधानाचे रक्षण करणार !म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होत की कांग्रेस हे जळते घर आहे.
यांच्या पासून चार हात दूरच रहा. कांग्रेस को समर्थन करनेवाले दलितों को लिए आत्महत्या के बराबर है. असे हे आरक्षण खत्म करनेवाली कांग्रेस यांचा निषेध असो अश्या प्रकारचा निषेध भाजपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी भाजपानी केलेल्या निषेध सभेत व्यक्त केले.
आरक्षण रद्द करू असे म्हणणारे कांग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तवावर इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे निषेध सभा घेण्यात आली यात माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले की आरक्षण हे आमच्या हक्काच आहे नाही कुणाच्या बाप्पाच तेव्हा आरक्षण रद्द करू पाहणाऱ्या कांग्रेस चा निषेध केला.
संविधानाला हात लावले तर त्याचे हातच झाटून टाकू डॉ मिलिंद नरोटे , विधानसभा प्रमुख प्रमोद पिपरे,रमेश भुरसे , माजी नगराध्यक्ष पिंपरे मॅडम डॉ. कोडवते मॅडम ,हिंगे मॅडम ,डॉ. तिडके आदिनी आरक्षण रद्द करू पाहणाऱ्या कांग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहीर निषेध केला.
निषेध सभेत नगरसेवक केशव निंबोळ 'देवाजी लाटकर , अनिल पोहनकर ' जनार्धन साखरे , कावळे,नामदेव शेंन्डे , प्रा. उराडे , आदि सहीत भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.