सावली येथे आदिवासी मुला मुलीं करिता वस्तीगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद च्या वतीने निवेदन.
सुदर्शन गोवर्धन ! प्रतिनिधी
सावली तालुक्यातील आदिवासी समुदायातील मुले व मुलींकरिता शिक्षणाची योग्य सोय सुविधा व्हावी करिता सावली ला वस्तीगृह गेले दोन ते तीन वर्षापासून सुरू करण्यात आले आदिवासी विभागाचे शासकीय स्वतंत्र इमारत नसल्यामुळे अनेक वर्षापासून किरायाच्या रूम मध्ये भाडेतत्त्वावर घेण्यात आलेले आहे.
सावली येथे नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या सीमेत जागा उपलब्ध असेल तर ती आदिवासी मुली मुलींचे वस्तीगृह निर्माण करण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यात यावे करिता सावली तालुका अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अध्यक्ष प्रवीण गेडाम यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी नागरगोजे यांना निवेदनातून मागणी केली आहे.
स्वतंत्र इमारत नसल्यामुळे जागे अभावी आदिवासी मुले मुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे एकीकडे भाडेतत्त्वावर असलेले वस्तीगृह शाळा कॉलेज पासून भरपूर दूर असल्यामुळे विद्यार्थ्यांना येजा करण्याकरिता मोठी अडचण निर्माण झालेली आहे त्यामुळे सावली कोर्टाच्या मागील असलेली किंवा समोरील असलेली जागा आदिवासी मुलांच्या मुलींच्या वस्तीगृहाकरिता उपलब्ध करून देण्यात यावी अशी प्रवीण गेडाम अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सावली तालुका यांनी नगरपंचायत कडे जागा उपलब्ध असल्याचे अहवाल करिता मागणी केली आहे.