अहेरी पोलीस उप,मुख्यालय प्राणहिता येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई याने केली आत्महत्या.
एस.के.24 तास
अहेरी: पोलीस उप मुख्यालय प्राणहिता येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई ज्ञानेश्वर केंद्रे जिल्हा नांदेड यांनी काल रात्रौ अंदाजे 10.00 च्या दरम्यान आत्महत्या केल्याची माहिती मिळालेली आहे.
त्यामुळे पोलीस विभागात एकच खडबड उडालेले आहेत. ज्ञानेश्वर केंद्रे यांनी या अगोदर C - 60 मध्ये सुद्धा नोकरी केलेली आहे.त्यांची पोस्टिंग पोलीस उप मुख्यालय प्राणहिता येथे होती.परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रास सहन न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.
त्यामुळे केंद्रे परिवारावर शोसकळा पसरलेली आहे. तरी या आत्महत्येसाठी जबाबदार कोण आहे ? याचा तपास करून त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केंद्रे परिवाराने पोलीस अधीक्षक,गडचिरोली यांच्याकडे केली आहे