नागभीड तालुक्यातील अनेक युवक युवतींनी हातात घेतले आप चे झाडू ; दहा युवक युवतींनी केला आम आदमी पार्टीत प्रवेश.
★ आपच्या रोजगार यात्रेने प्रभावित होऊन अनेक युवक युवती आपच्या वाटेवर.
एस.के.24 तास
नागभीड : चिमूर विधानसभा क्षेत्रात बेरोजगारांची वाढती संख्या चिंतेचा विषय असून राजकीय उदासीनता नकारात्मकता याला जवाबदार आहे रोजगार उपलब्ध नसल्याने बेरोजगार हे वाम मार्गाला लागून अवैध कामे करुन वाईट व्यसनाला लागली आहेत नेमका हाच मुद्दा पकडून आम आदमी पक्षाने रोजगार यात्रेची सुरवात करून रोजगार उपलब्ध करुन देण्यास सुरवात केली आहे यात काही युवकांना रोजगार मिळाल्याने नागभीड तालुक्यातील अनेक युवक युवतींनी आप पक्षाचे झाडू हातात घेतले असून अनेक युवक युवती आप पक्षाच्या वाटेवर आहेत.
आम आदमी पक्षाने चिमूर विधानसभा क्षेत्रात फिरून येथील संपूर्ण परिस्थिती चे अवलोकन करून अभ्यास केला असता अनेक सुशिक्षित युवक बेरोजगार असल्याचे निदर्शनास आले हाताला काम नसल्याने रिकामे आहेत याला राजकीय उदासीनता जवाबदार असून मागील अनेक वर्षांपासून कुठलेही उद्योग धंदे नसल्याने बेरोजगारी ची कुऱ्हाड नेहमीच त्यांच्या माथ्यावर लटकलेली दिसते नेमक्या याच परिस्थिती चा अभ्यास करून आप पक्षाचे प्रा.डॉ.अजय पिसे यांनी या क्षेत्रातील युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देऊन रोजगार यात्रेची सुरवात करीत युवकांना रोजगार उपलब्ध करून दिले.
त्यांच्या या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा यात्रेने अनेक युवक युवती प्रभावित झाले आणि नागभीड तालुक्यातील अनेक युवक युवतींनी आप पक्षात प्रवेश करीत आपचे झाडू हातात घेऊन बेरोजगारी निर्माण करणाऱ्या अनेक पक्षाचे सफाया करण्याचे ठरविले आहे.
यावेळी खुशाल राऊत प्रभू सहारे अरविंद चहांडे कृष्णा पिलारे प्रजवल मानापुरे देवा मानापुरे यामीना राऊत रक्षा राऊत स्नेहा तुपट कोमल राऊत आदी युवक युवतीने आप पक्षाचे प्रा डॉ. अजय पिसे यांच्या उपस्थितीत आप पक्षाची टोपी आणि दुपट्टे टाकून आप पक्षात प्रवेश केला यावेळी आप पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला पुरुष उपस्थित होते.