शिक्षक दिनी विजुक्टाने अन्याय दिन पाळला.

शिक्षक दिनी विजुक्टाने अन्याय दिन पाळला. 


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्या सोडविल्या जात नाही. शासनाला वारंवार निवेदन देऊनही सरकार अमलबजावणी करीत नाही. म्हणून १२ विच्या पेपर तपासणीत शिक्षकांनी बहिष्कार टाकल्यानंतर शासनाने लेखी आश्वासन दिले होते. म्हणुन पेपर तपासणीचा बहिष्कार मागे घेतला होता व उत्तर पत्रिका तपासल्या होत्या. अधिवेशन संपल्या नंतर शिक्षकांच्या समस्या सोडवू असे सांगीतले होते. 


परंतु शासनाने बोलणी केली नाही त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला होता. त्यामुळे मागण्याच्या पुर्ततेसाठी शिक्षक दिनी तहसिल कार्यालय गडचिरोली समोर धरणे आंदोलन करून तहसिलदार गडचिरोली मार्फत मा. मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना विजुक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय कुत्तरमारे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. 


कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडीसाठी विद्यार्थी संख्या कमी करावी , २००५ मधे नविन नियुक्ती झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागु करावी . शासकिय योजनेप्रमाणे आश्वासित प्रगत योजना लागु करावी . नक्षलग्रस्त भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांना एकस्तर वेतन श्रेणी व घरभाडे लागु करावे. आदि विविध मागण्या घेऊन विजुक्टा तर्फे घरणे आंदोलन करण्यात आले. 


विजुक्टाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रा. अविनाश बोर्ड महासचिव डॉ. प्रा. अशोक गव्हाणकर विजुक्टाचे जिल्हाधक्ष प्रा. विजय कुतरमारे , केंद्रिय संघटन सचिव प्रा. धर्मेद्र मुनघाटे , प्रा. देवेंद्र वडमलवार , प्रा. चंद्रभान खोब्रागडे , प्रा. मनोज बावणकर , प्रा. रेवनदास सडमाके प्रा. सचिन दुमाणे , प्रा. सुनिल कांबळी प्रा. प्रताब शेंन्डे ,प्रा. ज्ञानेश्वर धक्काते प्रा. विलास पारधी , प्रा. विद्या कुमरे प्रा. गिता उदापूरे प्रा. विजया मने , प्रा. सुनिता साळवे सहीत बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !