सामुहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा तालुका व जिल्हा स्तरीय ग्रामसभा महासंघ सक्षमीकरण कार्यशाळा.

सामुहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा तालुका व जिल्हा स्तरीय ग्रामसभा महासंघ सक्षमीकरण कार्यशाळा.


एस.के.24 तास


सावली : विदर्भ उपजीविका मंच,विदर्भ ग्रामसभा महासंघ, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ,रिवार्डस मल्टिपर्पज सोसायटी,नागभिड यांच्या संयुक्त विद्यमाने सावली, जिल्हा - चंद्रपूर, येथे सामुहीक वन हक्क प्राप्त ग्रामसभा तालुका व जिल्हा ग्रामसभा महासंघ सक्षमीकरण कार्यशाळा दिनांक ३० व ३१ आगस्ट २०२४रोजी पत्रकार भवन सावली येथे आयोजित केली होती.



या दोन दिवसिय कार्यशाळेत प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून विदर्भ निसर्ग सरक्षण संस्था नागपुर चे कार्यकारी संचालक मा. श्री. दिलीपजी गोडे,ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ चे संस्थापक मा.डॉ.किशोरजी मोघे,सावली चे सवर्ग विकास अधिकारी श्री. मधुकर वासनिक, रीवार्ड्स मल्टिपरपज सोसायटी नागभीड चे संस्थापक गुणवंत वैद्य, ग्राम आरोग्य संस्था घाटी कुरखेडा चे संस्थापक श्री.रुपचंदजी दखने, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ चे प्रकल्प अधिकारी श्री. श्रीकांत लोडम,यांची प्रमुख उपस्थिती होती.


 तसेच रीवर्ड्स संस्थेचे सामुहीक वन हक्क समन्वयक, भोजराज नवघडे,कैलाश नान्नावरे, मोतीराम नागपुरे,तालुका ग्रामसभा महासंघ नागभिड चे सचिव श्री.मनोहर मगरे,सिंदेवाही ग्रामसभा महासंघाचे अध्यक्ष,श्री.मोरेश्वर गायकवाड हे उपस्थीत होते.सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती ग्रामसभा चे सावली तालुक्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !