AIMIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष,बाशिद शेख तर्फे तान्हा पोळा साजरा.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : AIMIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख तर्फे तान्हा पोळा साजरा करून दोन्ही समाजाला एकत्र आणण्याचे कार्य शेख यांचेकडून करण्यात आले बाशिद शेख यांच्या कडून प्रथम पारितोषिक 3001 द्वितीय पारितोषिक 2001, तृतीय पारितोषिक 1001 रुपये व प्रोत्साहन नोटबुक आणि पेन्सिल पॅक सर्व बक्षिस AIMIM जिल्हा अध्यक्ष,बाशिद शेख यांच्या कडून देण्यात आले.
प्रथम पारितोषिक जय श्रीराम नाट्य कला मंडळ चे अध्यक्ष तुळशीराम हजारे, गोविंदा शेंडे, महागु शेंडे, मुकेश शेंडे, रवींद्र निकोडे, विजय निकोडे सोमनाथ लाकडे, जनार्दन मेश्राम, दिपक कोसमशिले,यांच्या हस्ते देण्यात आले द्वितीय पारितोषिक बाशिद यांचे चिरंजीव रेहान शेख, जिशान शेख,यांच्या हस्ते देण्यात आले तृतीय पारितोषिक AIMIM पक्षाचे महीला अध्यक्ष आयशा अली सय्यद, शगुप्ता शेख, शमीना ताई, जया ताई कोंडे, नीलु ताई रगडे, मनीषा ताई वानखेडे, वर्षाताई खंडागळे, स्मिताताई संतोषवार, सरिता बावणे, शोभाताई शेरकी, यांच्या हस्ते देण्यात आले या वेळी नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ चे अध्यक्ष मनोज भोयर उपाध्यक्ष गणेश बोगवार, आदींनी सहकार्य केले या वेळी AIMIM पक्षाचे सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष जावेद शेख, महीला अध्यक्ष आयशा अली सय्यद, जया कोंडे, शमीना ताई,आदि उपस्थित होते.