बल्लारपूर येथे 72 वर्षीय वृद्धाने केली लैंगिक सुखाची मागणी ; पास्को अंतर्गत कारवाई.
एस.के.24 तास
बल्लारपूर : बल्लारपूर येथील रविंद्रनगर वार्ड मधील ७२ वर्षीय आरोपी याने त्याचे घरी किरायाने राहत असलेल्या कुटुंबातील सतरा वर्षीय तसेच पंधरा वर्षीय पिढीतेवकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप केले आहे.फिर्यादी मुली आपल्या परिवारा सहित किरायाने राहतात. घरमालकाने त्या दोन्ही मुलींना २०० रू. व ५०० रुपये दिले होते.
घर मालकाने त्यांना पैसे चे बदल्यात लैंगिक सुखाची मागणी केल्याची फिर्याद पोलीस स्टेशन येथे केली आहे.बल्लारपूर शहरात ७२ वर्षीय पुरुषाने दोन नाबालिक कडे लैंगिक सुखाची मागणी केल्याचे शहरात खळबळ उडाली.
अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलिसांनी बल्लारपूर येथे अप क्रमांक ८९३/२४ कलम ७५ (१)(१), ७५(१)(२), ७५(२), ३३२(क )भारतीय न्याय संहिता सह कलम ८,१२ लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिनल कापगते करीत आहे.