आर.पि.आय.चंद्रपूर ज़िल्ह्यातील 6 ही विधानसभा स्वतंत्रपणे लढाविणार.

आर.पि.आय.चंद्रपूर ज़िल्ह्यातील 6 ही विधानसभा स्वतंत्रपणे लढाविणार.


  मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


चंद्रपूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संस्थापक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर) ने ज़िल्ह्यातील  विधानसभेच्या सहाही जागा स्वतंत्रपणे लढाविण्याचा निर्णय घेतलेला असून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे पार पडलेल्या पक्षाच्या ज़िल्हा बैठकीत देण्यात आल्या. 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज़िल्हाध्यक्ष मा.गोपाल रायपूरे हे होते.नागपूर प्रदेश उपाध्यक्ष नेताजी वि.तु.बुरचुंडे,नागपूर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन,उपाध्यक्ष,कोमल रामटेके, महिला आघाडी ज़िल्हाध्यक्षा लिनता जुनघरे, बाजीराव उंदीरवाडे, रामसिंग सोहल, गुरूदास रामटेके, देशकुमार खोब्रागडे, संतोषभाई रामटेके, अजय चौहान, अनिल वानखेडे, नंदा रामटेके, डॉ. दीपा चांदेकर, प्रा. आर. एन. पाटील इत्यादी पक्ष नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. बैठकीचे सूत्रसंचालन ज़िल्हा महासचिव मोरेश्वर चंदनखेडे यांनी केले.

       

देशाची वाटचाल  शोषित,  श्रमिक, शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी व महिलांच्या सामाजिक - राजकीय - आर्थिक गुलामीकडे सुरु आहे. संविधानाने दिलेले एस. सी., एस. टी, ओ. बि. सी. चे आरक्षण विविध मार्गाने संपविण्याचा घाट घातलेला आहे. शेतकरी - शेतमजूर हवालदिल आहे. सुशिक्षित तरुण बेरोजगार आहे.महिलांवरील अत्याचारात कमालीची वाढ झालेली आहे. धार्मिक बहुसंख्यांक - अल्पसंख्यांक वाद विदारक रूप घेत आहे. कामगार - कर्मचारी अनेक समस्यांचा सामना करीत आहेत.संविधानाला धोका निर्माण झालेला आहे.


ही परिस्थिती स्वातंत्रच्या 75 वर्षा नंतरही शोषित - श्रमिक, शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी आणि महिलांना गुलाम बनविणारी आहे. हे सर्व सत्तानिर्मित आहे.  देशातील  प्रस्थापित राजकीय पक्षांना सत्तेचे राजकारण करण्यासाठी ही परिस्थिती पोषक आहे. त्यामुळे यावर कोणताही राजकीय पक्ष  भूमिका घेताना दिसत नाही.


    अशास्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 30 सप्टेंबर 1956 रोजी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने हा लढा जिवंत ठेवला पाहिजे असे मत बैठकीस उपस्थित रिपब्लिकन कार्यकर्त्यानी व्यक्त केले. 


     यावर चर्चा करून ज़िल्ह्यातील सहाही विधानसभा स्वतंत्रपणे लढवाव्या आणि केवळ सत्ता आणि स्वार्थाच्या राजकारणा करीता मतांचे भाविनिक दोहन करणाऱ्या विरोधात लढा उभारावा असा निर्णय घेण्यात आला.


     त्याकरिता विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या तालुक्यात जोमाने कामाला लागण्याचा मनोदय या बैठकीत व्यक्त केला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !