महा.राज्य मादगी समाज संघठना एम 4 महासंघ,अ.भा.मादगी समाज सामाजिक संघटना अ.जा.वंचितांची बैठक संपन्न.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
चंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयानी अ. जाती व अ. जमाती आरक्षण कोट्यात कोटा हा 07 - 01 च्या जजेसच्या सुप्रीम निर्णयाचे चंद्रपुर महाराष्ट्र येथे स्वागत करुन मा. सरन्यायाधिश चंद्रचूड़ व इतर सात न्यायाधीशांचे अभिनंदन करण्यात आले. ह्या सभेचे अध्यक्ष मा.प्रा.हरिश्चंद्र भानुजी नक्कलवार, समाजसेवी कार्यकर्ता व बामसेफ मार्गदर्शक हे होते.
मादगी समाज भवन, चंद्रपुर येथे बैठक पार पडली. अन्नाभाऊ साठे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करुन सभेची शुरूवात मा.किशोर नगराळे , जेष्ठ मार्गदर्शक ,समता संघर्ष सा.प
स.यांनी केली.व प्रास्ताविक मा.शंकर सिटलवार, सचिव,मा.स.स.यांनी केली. तसेच बैठकिची विषयसुची लालाजी पोवरे यांनी वाचून दाखविली तसेच त्यांनी उत्तम सुत्र संचालन केले.सुरवातीला सर्व कार्यकर्त्यांनी आपसी परिचय करुन घेतला. मा.नक्कलवार,अध्यक्ष, यांनी विषयांच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले.
आरक्षणात आरक्षण का ? ह्याची गरज सन 1950 पासूनच कशी होती व मागील 80 ते 90 वर्षांमध्ये काही मोजक्या जातीसमुहाची प्रगती का व कशी झाली आरक्षण समुहातील इतर जाती कशा वंचित व उपेक्षित राहल्यात याबद्दल ऐतिहासिक प्रांतीय प्रमाण देवून,सात सदस्यीय संसदीय समिति अर्थात सात जजेसंनी दिलेल्या 01आगस्ट 2024 च्या निर्णयाचे स्वागत केले.
तसेच हां निर्णय लोकनायक अन्नाभाऊ साठे यांच्या जयंतीला सर्वोच्च न्यायालयांने समर्पित केल्यांने समाजाच्या वतिंने न्यायालयाचे जाहीर अभिनंदन केले.पुढे बोलतांना त्यांनी अन्नाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रम आयोजित करुन अनुसुचित जाती आरक्षण उपवर्गवारी समिति स्थापित करुन त्यात मोची (चांभार),मादगी, मादिगा ,मादर ,सोबतच मेहत्तर,मांग, खाटिक, मान्यप ,बुरड, डक्कल,कैकाडी तथा तत्सम वंचित जातींचा समावेश करण्याचा सामुहिक संकल्प व्यक्त केला.
याप्रसंगी मा.किशोर नगराळे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक व समाज मार्गदर्शक यांनी आपले परिवर्तनपर विचार व्यक्त केले.ते म्हणाले कि स्वातंत्र्योत्तर काळात ज्या अनुसुचित समुहांचा विकास झाला तो डॉ.आंबेडकर यांच्या संविधानिक व धम्माच्या विचारावर आचरण केल्यांनेच.
त्यांनी स्वता सुद्धा बौद्ध झाल्यानेच माझी व कुटुंबाची सर्वांगीण प्रगति झाली. विशेष आरक्षण भिक नाही व त्याचा हिस्सा घेण्यासाठी वंचित समुदायांने संगठित करावा असे आव्हान केले. याप्रसंगी मा.इंजी दिनेश भटवलकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण कोट्यात कोटा निर्णयाचे मनपुर्वक स्वागत केले.
होऊं घातलेल्या उपवर्गवारी समितित काम करण्याचा संकल्प केला. मा. आसमपल्ली, संघठक ,एम 4 महासंघ , यांनी मा. मांदाक्रिष्णा यांच्या आंध्र प्रदेश व तेलंगाना येथून तर दिल्लीपर्यंत केलेल्या प्रयत्नांची आठवण करून सर्वोच्च न्यायालयाचे अभिवादन केले.
या प्रसंगी अ.मा मादगी समाज संघठणेच्या मा. सुनिल त्रिसुडे,मा.बद्दलवार,मा.कोकमवार,मा गोरडवार,तसेच महाराष्ट्र राज्य मासस,एम 4 महासंघांचे,मा.निलेश गोडशेलवार , मा.एल.वाय.पोवरे,मा.पन्नानंद नक्कलवार,मा, सुनिल नक्कलवार,रायमल्लू रेनकुंटला,मा शंकर सिटलवार,मा राजेशम पुल्लिरी,मा गजानन आलेवार सावली,मा रमेश लिंगमपल्लीवार,मा.डॉ. शंकर तोकल, तसेच मा रुपेश वालकोंडे समता संघर्ष सापस.
प्रदेश अध्यक्ष,यांनी सभेला मार्गदर्शन करतांनाच सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण कोट्यात कोटा निर्णयाचे स्वागत केले,राज्यस्तर पुढील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकल्प केला.मा आरकिला, मा समय्या कामपल्ली,चंद्रपुर,कनिष्ठा तोकल, सुहास कवलवार व अन्य 27 समाज बांधव सभेला उपस्थित होते .सभेच्या यशस्वितेसाठी निलेश गोडशेलवार,आसमपेल्ली,सुनिल त्रिसुडे,महादेव कोकमवार व अनिल बद्दलवार,मा राजेशम, पुल्लिरी,तोकल यांनी सहकार्य केले.
मादगी समाज भवन सभेसाठी दिल्याबद्दल मादगी समाज सुधार समितीचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली. सभेतून परत जातांना कार्यकर्ता आनंदित व उत्साहित होता .