पीपल्स रिपब्लिकन पार्टी लढविणार राज्यातील विधानसभेच्या 33 जागा ; पश्चिम विदर्भातून पहिल्या उमेदवाराची घोषणा.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीची राज्यात 33 जागा लढविण्याची तयारी असून त्यामध्ये पश्चिम विदर्भातील दर्यापूर/ तिवसा/ कारंजा (लाड) /वाशिम /उमरखेड/ अकोला (पश्चिम )/बाळापुर/ मलकापूर ह्या 8(आठ) जागांचा समावेश असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली आहे.
, अमरावती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्यावतीने आयोजित केल्या गेलेल्या अमरावती विभागीय कार्यकर्ता संवाद परिषदेला उपस्थित राहण्याकरता अमरावती येथे आले असता स्थानिक विश्रामभवन येथे 1सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी पश्चिम विदर्भातील पक्षाच्या पहिल्या उमेदवारांची घोषणा करताना कारंजा (लाड )विधानसभा मतदारसंघा तून पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक प्रमोदराव टाले (पाटील) यांच्या नावाची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
, पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहे पर्यायाने महायुतीचा घटक पक्ष आहे .आमच्या पक्षाने 33 जागा लढवण्याची तयारी सुरू केली असली तरी त्यापैकी महायुती मध्ये किमान आठ8 जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात अशी मापक अपेक्षा असून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे .त्याचबरोबर विधान परिषदेवर घेतल्या जाणाऱ्या राज्यपाल नामनियुक्त 12 आमदारांमध्येही आमचे पक्षाला प्रतिनिधित्व म्हणून एक जागा मिळावी अशी मागणी महायुतीकडे करणार असल्याचे सांगून त्या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही सांगितले .
अलीकडे महाराष्ट्राला अत्यंत वेदना देणारी घटना घडली ती म्हणजे राजकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला ही राज्याकरिता मोठी दुर्दैवाची बाब आहे .राज्यात पहिल्यांदाच घडलेली ही दुर्दैवी घटना आहे . अत्यंत बेजबाबदार पणाने पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकारासह संबंधित सर्व लोकांवर अतिशय कठोर कार्यवाही केल्या जावी . अशी मागणी करून संभाजी भिडे यांचा ही समाचार घेताना म्हणाले की महाराष्ट्राच्या कुलदैवतांचा पुतळा कोसळल्यानंतरही संभाजी भिडे आता हे कुठेही दिसून येत नाही साधी प्रतिक्रिया ही व्यक्त केल्या जात नाही .
पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेचा सनातन प्रभात शी काही संबंध आहे का या दिशेने देखील तपास केल्या जावा कारण डॉ नरेंद्र दाभोळकर गोविंद पानसरे कलबुर्गी यांची हत्या झाल्यानंतर संशयित म्हणून जे सनातन चे लोक रडारवर होते त्या दिशेने तपास होणे गरजेचे आहे. असेही जोगेंद्र कवाडे म्हणालेत.
आरक्षण संदर्भात बोलताना प्रा कवाडे म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय पूर्णतः असैवधानिक असून संविधानाचा उल्लंघन करणारा असा आहे . संविधानाचे रक्षण करणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम आहे .परंतु तसे न होता न्यायालयाचा निकाल कुंपणानेच शेत खावे अशातला हा प्रकार असून एससी/ एसटी आरक्षण संदर्भातील वर्गीकरणाचा निर्णय संसदेने विशेष अधिवेशन बोलावून तो तात्काळ रद्द करावा अशी मागणी ही प्रा.कवाडे यांनी केली आहे.
महिलांवरील अत्याचारांच्या संदर्भात बोलताना म्हणाले की राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार चे प्रमाण वाढत आहे.बदलापूर येथील घटनेची एसआयटीमार्फत चौकशी केल्या जावी.आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने कठोर उपाययोजना करावी . अत्याचार करणाऱ्या नराधमांना सरळ एन्काऊंटर केले पाहिजे जेणेकरून महिलांवरील वाढत्या अत्याचाराला आळा बसेल असे क्रोधित होऊन कवाडे म्हणाले.
एकनाथ मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केलेली लाडकी बहीण योजना ही अत्यंत लोकप्रिय ठरत असल्याने विरोधी पक्षांच्या पोटात पोटशूळ उठत आहे. या योजनेच्या विरोधात उठ सूट काहीही बोलत आहे . मात्र येथे विधानसभा निवडणुकीत महिला विरोधकांना आपली जागा दाखवून देईल असे विरोधकांवर बोलताना प्रा.कवाडे यांनी महिलांना आर्थिक आधार देण्याचा सरकारचा उपक्रम हा स्तुत्य असून पक्षाच्या वतीने या योजनेचे व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वागत करण्यात येत आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले प्रदेश संघटन सचिव प्रमोद टाले प्रा.डी .के.वासनिक, अमरावती जिल्हाध्यक्ष विलास पंचभाई,जिल्हा प्रभारी चंद्रकांत गुल्हाने
एडवोकेट दीपक आकोडे, सुरेश बहादुरे डी.जे.खडसे यवतमाळ,वासुदेव सामटकर बाळासाहेब इंगोले साहेबराव वानखडे प्रवीण सरोदे,भास्कर वराडकर प्रकाश रंगारी जानराव वाटाणे श्रीकृष्ण पळसपगार रामेश्वर इंगळे माणिकराव गाडगे डॉक्टर अशोक गुजर चंद्रसेन रंगारी महादेव थोरात सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.