सावली तालुक्यातील 300 हेक्टर जमीनीचे पिकांचे नुकसान ; गोसी खुर्द प्रकल्पाचे पाणी सोडल्याने कृत्रिम महापुराचा फटका.
एस.के.24 तास
सावली : गोसीखुर्द प्रकल्पाचे 30 दरवाजे खुले केल्याने वैनगंगा नदीला कृत्रिम रिला पुर आल्यामुळे वैननांगा नदि किराऱ्यावर लागून असलेला सावली तालुक्यातील करोली आकापूर बोरमाळा चिखली डोंगरगांव निफंद्रा निमगांव दाबगांव मौसी ' थेरगांव बेळगांव चिचबोळी मोखाळा वाघोली बुट्टी निलसनी पेटगांव इत्यादी गावातील जवळपास ३०० हेक्टर जमीनीतील धान पिकाचे व इतरही पिकाचे अभोनाथ नुकसान झाले असून उभे पिकाची नासाठी झाली.
आज दिं.१२ सष्टेंबरल २०२४ रोजी सुद्धा सावली तालुक्यातील नैनगंगा नदि किनाऱ्या वरील शेती गेल्या तिन दिवसापासून पुराखाली आहे. शेतकऱ्यावरती आत्महत्या करणाची पाळी आलेली आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतावर गेल्यावर धानाची नासाडी झालेली पाहुण शेतकऱ्यांच्या डोळातून आसवांचा पुर वाहत आहे.
अश्या परिस्थितीत राज्य शासन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई घ्यावी असे शेतकऱ्यांच्या वतीने रिपब्लिकन पार्टी चे चंद्रपूर जिल्हाधक्ष,गोपाल रायपूरे रिपाईचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर , रिपाई तालुकाध्यक्ष किशोर उंदिरवाडे लोमेश सोरते ,निफ्रद्राचे सरपंच पुरुषोत्तम नवघडे ' बोरमाळाचे सरपंच भोजराज धारणे आदिनी केलेले आहे. तस्या प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिले.