एटापल्ली तालुक्यातील डॉक्टर ला शासकीय रुग्णवाहिकेतून चक्क दारूची वाहतूक करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले ★ डॉ.ब्रम्हानंद पुंगाटी सह 3 अटक 1 फरार ; 2 दिवसाची पोलीस कोठडी.

एटापल्ली तालुक्यातील डॉक्टर ला शासकीय रुग्णवाहिकेतून चक्क दारूची वाहतूक करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले


★ डॉ.ब्रम्हानंद पुंगाटी सह 3 अटक 1 फरार ; 2 दिवसाची पोलीस कोठडी.


एस.के.24 तास


एटापल्ली : एकीकडे अपुऱ्या सुविधे मुळे आरोग्य व्यवस्थाच आजारी पडल्याचे चित्र असताना डॉक्टर लाच दारू तस्करी करताना अटक करण्यात आल्याने गडचिरोली आरोग्य विभाग पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एटापल्ली तालुक्यातून 17 सप्टेंबर ला ही संतापजनक घटना समोर आली.एका डॉक्टर ला शासकीय रुग्णवाहिकेतून चक्क दारूची वाहतूक करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यामुळे आरोग्य वर्तुळ हादरले आहे.


ब्रम्हानंद रैनू पुंगाटी वय,29 वर्षं रा.बारसेवाडा ता. एटापल्ली असे त्या डॉक्टरचे नाव आहे.नक्षल प्रभावित व आदिवासी बहुल पिपली बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात तो कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. 


15 सप्टेंबर रोजी पहाटे हालेवारा पोलीस मवेली - हालेवारा - पिपली बुर्गी या मार्गावर नाकाबंदी करत होते. यावेळी MH.33 T 4478  ही तेथून जात होती. रुग्णवाहिका असल्याने पोलिसांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले.चालकाने गाडी सुसाट नेण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी पाठलाग करत रुग्णवाहिका थांबवून तपासणी केली असता आत देशी दारूचे 10 बॉक्स व विदेशी दारूच्या 96 बाटल्या आढळल्या. 


डॉ.ब्रम्हानंद पुंगाटी सह शशिकांत बिरजा मडावी वय,33 वर्ष रा.एटापल्ली,सौरभ गजानन लेखामी वय,20 वर्ष रा. पिपली बुर्गी,भिवाजी रैनू पदा वय,31वर्ष, रा.पिपली बुर्गी) यांना ताब्यात घेतले तर अंधाराचा फायदा घेत दिलीप लालू लेखामी (रा.पिपली बुर्गी) हा पळून गेला. 


याप्रकरणी हालेवारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून देशी – विदेशी 88 हजार 60 रुपयांची दारू व रुग्णवाहिका जप्त करण्यात आली आहे.


जिल्ह्यातील दुर्गम भागात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अनेकांना जिवा गमवावा लागला आहे. अजूनही अशा घटना समोर येत असतात.पण या डॉक्टरने दारू तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर केल्याने वैद्यकीय वर्तुळाला धक्का बसला आहे.या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक,अक्षय पाटील करत आहेत.

दोन दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान,चारही आरोपींना १६ रोजी एटापल्ली न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले,अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.


तात्काळ बडतर्फी : - 

पोलिसांच्या कारवाईनंतर जिल्हा परिषद सी.ई.ओ .आयुषी सिंह यांनी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ.ब्रम्हानंद पुंगाटी यास तडकाफडकी बडतर्फ केले आहे.यात सहभागी अन्य कर्मचारी रडारवर आहेत.त्यांच्या वरही कारवाई अटळ मानली जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !